जीवन क्षणभंगुर आहे; कोरोना लसीबाबत सद्गुरुंनी दिला 'हा' मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 03:08 PM2021-03-13T15:08:57+5:302021-03-13T15:12:45+5:30
कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) देशव्यापी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
नवी दिल्ली : कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination) देशव्यापी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्वप्रथम कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यानंतर अनेक नेते, मंत्री, दिग्गजांनी लस घेतल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी मोलाचा सल्ला दिला आहे. जीवन हे क्षणभंगुर असल्याचेही ते म्हणाले. (know what sadhguru jaggi vasudev says about vaccination in india)
एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सद्गुरू यांनी कोरोना लसीकरणाबाबत सविस्तरपणे आपली मते मांडली. जेव्हा आपण श्रद्धेने, निष्ठा ठेवून तसेच विश्वास बाळगून एखादे काम करता तेव्हा ते सर्वोत्तम होत असते. तेव्हा आपल्याला सामान्य मानवाला शक्य नसलेल्या गोष्टींची प्रेरणा मिळू शकते, असे सद्गुरू यांनी सांगितले. कोरोना लसीला घाबरण्याचे कारण नाही, असेही ते म्हणाले.
रतन टाटांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस; म्हणाले, “लवकरच...”
लसींमुळे जीवन सुरक्षित
कोरोना लसीबाबत बोलतान ते पुढे म्हणाले की, लहानपणापासून आपल्याला कोणत्या ना कोणत्या लसी टोचल्या जातात, दिल्या जातात. यामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होते. असे नसते, तर १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीयांची सरासरी वयोमर्यादा केवळ २८ वर्षे राहिली असती, असे सांगत आधुनिक विज्ञानाचे फायदे आपण लक्षात घेत नाही. आधुनिक विज्ञानाने विकसित केलेली औषधे नसती, तर आपण केव्हाच मृत्युमुखी पडलो असतो. साधा तापही माणसाच्या मृत्युचे कारण ठरू शकतो. त्यासाठी कॅन्सर व्हायची आवश्यकता नाही, असे सद्गुरू म्हणाले.
...म्हणून जनता घाबरत आहे
कोरोना विषाणू संसर्ग घातक आहे. एका शिंकेनेही आपले जीवन संपू शकते, हे या विषाणूने दाखवून दिले आहे. आजच्या घडीला बॉम्बस्फोटापेक्षा लोकं एकमेकांच्या शिंकांना जास्त घाबरत आहेत, असे सद्गुरूंनी सांगितले. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकं जीवनाच्या क्षणभंगुरतेचा अधिक विचार करत आहेत. याबाबत आपण विचार करता, तेव्हा आपण वास्तविकपणे अध्यात्मिक विचार करता, अध्यात्माकडे जाता, असे सद्गुरू म्हणाले. विनाकारण कोणत्याही गोष्टीसाठी माणसे वेळ वाया घालवत नाही. कारण आपल्या हातात आता मर्यादित वेळ राहिला आहे, याची जाणीव लोकांना झाली आहे, असे सद्गुरूंनी नमूद केले.
काय सांगता! कोरोनाचा फैलाव वुहानमधून नाही; WHO च्या शास्त्रज्ञांचा दावा
दरम्यान, उद्योगपती रतन टाटा यांनी कोरोना लसीचा पहिला डोस शनिवारी घेतला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस घेतला. त्याबाबत मी आभारी आहे. हे खूपच सोपे आहे आणि याचा बिलकूल त्रास झाला नाही. प्रत्येक व्यक्तीला लवकरच कोरोना लस मिळून तो सुरक्षित होईल, असे मला खरच वाटते, असा विश्वास रतन टाटा यांनी यावेळी व्यक्त केला. अनेक ठिकाणी कोरोना लसीबाबत संभ्रमावस्था असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रतन टाटा यांच्यासारख्या दिग्गज आणि ज्येष्ठ व्यक्तींने कोरोना लस घेतल्यानंतर सामान्य नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबत विश्वास वाढेल, असे सांगितले जात आहे.