हिंदूंचा सर्वात आवडता देव कोणता? श्रीकृष्ण, हनुमान की गणपती बाप्पा? सर्व्हेतून रंजक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2022 10:39 PM2022-03-01T22:39:35+5:302022-03-01T22:39:52+5:30
सर्वाधिक हिंदूंना आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर हिंदूंची सर्वाधिक श्रद्धा? सर्वेक्षणातून उत्तरं मिळाली
हिंदू धर्मीय ३३ कोटी देवतांना मानतात. पण सर्वाधिक हिंदूंना आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर हिंदूंची सर्वाधिक श्रद्धा आहे? या प्रश्नांची उत्तरं एका सर्वेक्षणातून मिळाली आहेत. हिंदू धर्मीयांना भगवान शंकर सर्वाधिक प्रिय आहेत. जवळपास एक तृतीयांश हिंदूंना हनुमान प्रिय आहेत. सरस्वतीला प्रिय मानणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे. सर्वेक्षणातून आणखीही रंजक माहिती समोर आली आहे.
प्यू रिसर्च सेंटरनं एक सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणातून हिंदूंना त्यांच्या सर्वात प्रिय देवी, देवतांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना विविध देवी, देवतांचे फोटो दाखवण्यात आले. त्यातून त्यांना तीन फोटो निवडण्यास सांगण्यात आलं. हिंदू धर्माला मानणारे जवळपास ४४ टक्के जण भगवान शंकराला प्रिय मानतात. जवळपास ३५ टक्के लोक हनुमानला आपला इष्ट देवता समजतात. तर ३२ टक्के हिंदूंना गणपती बाप्पा जवळचा वाटतो.
देशभरातील हिंदूंचे सर्वात लाडके देव शंकर आहेत. पश्चिम भारतातील ३० टक्के लोकच शंकराला इष्ट दैवत मानतात. या भागातील ४६ टक्के लोक गणपती बाप्पाला प्रिय मानतात. ईशान्य भारतातील ४६ टक्के हिंदूंना कृष्ण भगवान जवळचे वाटतात. ईशान्य भारतातील बहुसंख्य हिंदू श्रीकृष्णाची भक्ती करतात. भगवान राम, हनुमानाला इष्ट देवता मानणाऱ्यांची संख्या ईशान्य भारतात कमी आहे.