जाणून घ्या, भारतीय हवाई दलासाठी का आहे खास इस्रोचं Gsat-7A?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 10:04 AM2018-12-19T10:04:28+5:302018-12-19T10:12:55+5:30

भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) कम्युनिकेशन सॅटलाइट Gsat-7Aचं बुधवारी म्हणजेच आज प्रक्षेपण करणार आहे.

know why the GSAT-7A is special for the Indian Air Force | जाणून घ्या, भारतीय हवाई दलासाठी का आहे खास इस्रोचं Gsat-7A?

जाणून घ्या, भारतीय हवाई दलासाठी का आहे खास इस्रोचं Gsat-7A?

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) कम्युनिकेशन सॅटलाइट Gsat-7Aचं बुधवारी म्हणजेच आज प्रक्षेपण करणार आहे.  Gsat-7A सॅटलाइट जीएसएलव्ही- एफ 11 या रॉकेटमधून संध्याकाळी 4.10 वाजता श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात येणार या उपग्रहामुळे हवाई दलाच्या लढण्याच्या क्षमतेत कैकपटीनं वाढ होणार आहे.

नवी दिल्ली-  भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) कम्युनिकेशन सॅटलाइट Gsat-7Aचं बुधवारी म्हणजेच आज प्रक्षेपण करणार आहे. हे सॅटलाइट हवाई दलासाठी फायदेशीर सिद्ध होणार आहे.  Gsat-7A सॅटलाइट जीएसएलव्ही- एफ 11 या रॉकेटमधून संध्याकाळी 4.10 वाजता श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

Gsat-7A हा उपग्रह अवकाशाच्या कक्षेत पोहोचेल, त्याच वेळी तो हवाई दलाच्या वेगवेगळे रडार स्टेशन, एअरबेस आणि AWACSमध्ये इंटरलिंक होणार आहे. या उपग्रहामुळे हवाई दलाच्या लढण्याच्या क्षमतेत कैकपटीनं वाढ होणार आहे. Gsat-7A हे फक्त हवाई दलाच्या एअरबेसशीची इंटरलिंक होणार नाही, तर ड्रोन ऑपरेशनमध्येही या उपग्रहाची मदत होणार आहे.

या उपग्रहाच्या माध्यमातून ड्रोनवर आधारित असलेल्या मोहिमांमध्ये हवाई दलाला मोठी मदत मिळणार आहे. त्यात भारत अमेरिकेकडून प्रिडेटर-बी, सी गार्डियन ड्रोन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या ड्रोनला उपग्रहाच्या माध्यमातून नियंत्रित करून शत्रूंवर हल्ला करता येणार आहे. या उपग्रहाचा खर्च जवळपास 500 ते 800 कोटींच्या घरात आहे.

या उपग्रहामध्ये 4 सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. जे जवळपास 3.3 किलोवॉट वीजनिर्मितीत करणार आहेत. तसेच या उपग्रहात अवकाशातील कक्षांमध्ये वर-खाली स्थिरावण्यासाठी केमिकल प्रोपल्शन सिस्टीमही देण्यात आलं आहे. तत्पूर्वी इस्रोनं Gsat-7 या रुक्मिणी नावाचं सॅटलाइटही लाँच केलं होतं. या सॅटलाइटचं लाँचिंग 29 सप्टेंबर 2013मध्ये करण्यात आलं होतं. भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात वाढ करण्याचा या उपग्रहाचा उद्देश होता. या उपग्रहाच्या माध्यमातून युद्धनौका, पाणबुड्या आणि वायुसेनेच्या संचाराची सुविधा पुरवण्यात आली होती.  
 

Web Title: know why the GSAT-7A is special for the Indian Air Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो