कोहिनूर हिरा परत करण्यास बांधिल नाही, इंग्लंडचा भारताला झटका

By admin | Published: July 27, 2016 11:09 AM2016-07-27T11:09:41+5:302016-07-27T11:09:41+5:30

कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास आम्ही बांधिल नाही म्हणत इंग्लंडने पुन्हा एकदा हिरा परत करण्यास नकार दिला आहे

Kohinoor is not bound to return the diamond, England's blow to India | कोहिनूर हिरा परत करण्यास बांधिल नाही, इंग्लंडचा भारताला झटका

कोहिनूर हिरा परत करण्यास बांधिल नाही, इंग्लंडचा भारताला झटका

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 27 - कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास आम्ही बांधिल नाही म्हणत इंग्लंडने पुन्हा एकदा हिरा परत करण्यास नकार दिला आहे. इंग्लंडच्या या भुमिकेमुळे भारतामध्ये कोहिनूर हिरा परत येण्याच्या आशा कमी झाल्या आहेत.
 
'इंग्लंडने अगोदरपासून हीच भुमिका घेतली आहे. कोहिनूर हिरा भारताला परत करण्यास कोणताही कायदेशीर आधार आहे असं आम्हाला वाटत नाही. कायदेशीर मार्गाने न आणता दुस-या मार्गाचा विचार करत आहोत', असं ब्रिटनचे आशिया आणि पॅसिफिक मंत्री अलोक शर्मा यांनी स्पष्ट केलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार 15 ऑगस्टआधी सर्वोच्च न्यायालयात कोहिनूरसंबंधी शपथपत्र दाखल करणार आहे. 

संबंधित बातम्या -
('कोहिनूर'वरुन केंद्र सरकारचा यू-टर्न)
(कोहिनूर हिरा ब्रिटनने लुटून नेलेला नाही, तर भेट दिला!)
(कोहिनूर भारतात आणणं अशक्य असल्याची केंद्राची न्यायालयात माहिती)
 
जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटनने भारतावर राज्य करीत असताना येथून लुटून किंवा जबरदस्तीने नेलेला नाही, तर पंजाबच्या तत्कालीन राजाने तो त्यांना भेट दिला आहे. त्यामुळे भारत हा हिरा परत करण्याची मागणी ब्रिटनकडे करू शकत नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयास सांगितले होते. शिखांबरोबर झालेल्या युद्धांत ब्रिटिशांनी पंजाब काबीज केल्यानंतर पंजाबचे तत्कालीन शासक महाराजा रणजीत सिंग यांनी कोहिनूर हिरा ईस्टइंडिया कंपनीला भेटीदाखल दिला होता. पुढे १८५०मध्ये पंजाबचे गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी ब्रिटनच्या महाराणी व्हिक्टोरिया यांना तो ‘नजराणा’ म्हणून नेऊन दिला.
 

Web Title: Kohinoor is not bound to return the diamond, England's blow to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.