कोहलीला चिंता दिल्ली प्रदूषणाची
By admin | Published: November 9, 2016 02:11 AM2016-11-09T02:11:08+5:302016-11-09T02:11:08+5:30
दिल्लीमध्ये सध्या वायू प्रदूषणाची गंभीर स्थिती असताना यावर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली यानेही चिंता व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये सध्या वायू प्रदूषणाची गंभीर स्थिती असताना यावर भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली
यानेही चिंता व्यक्त केली आहे. कोहलीने याबाबत, दिल्लीकरांच्या आरोग्याला नुकसान न पोहोचविण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीकर कोहलीने या प्रदूषणाकडे लक्ष वेधताना इंस्टाग्रामवर पोस्ट करुन दिल्लीकरांच्या आरोग्याबाबत आवाहन केले आहे.
कोहलीने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, ‘आयुष्य खूप किमती आहे आणि पर्यावरण आपली जीवनवाहिनी आहे. आपण ज्या हवेमध्ये श्वास घेतो आणि जे पाणी आपण पितो, त्याला शुद्ध राखणे आपली जबाबदारी आहे. हे आपल्यापुरता किंवा आपल्या परिवारापुरता नसून संपूर्ण मानवतेसाठीही जरुरी आहे. आपल्याला पर्यावरण आणि आपल्या भविष्याचा यापासून विनाश करायचा नाही.’
सध्या राजकोट येथे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या सरावात व्यस्त
असताना कोहलीने दिल्लीतील प्रदूषणाविषयी चिंता व्यक्त
केली आहे. (वृत्तसंस्था)