मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना दिलं कोहली-स्मिथचं उदाहरण

By admin | Published: April 10, 2017 04:31 PM2017-04-10T16:31:39+5:302017-04-10T16:31:39+5:30

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कोम टर्नबुल हे चार दिवसाच्या भारत दौ-यावर आहेत.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्लम टर्नबुल यांनी संयुक्त पत्रकार घेतली.

Kohli's example was given by Modi to the Prime Minister of Australia | मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना दिलं कोहली-स्मिथचं उदाहरण

मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना दिलं कोहली-स्मिथचं उदाहरण

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅल्कोम टर्नबुल हे चार दिवसाच्या भारत दौ-यावर आहेत.आज पंतप्रधान नरेंद्र मोदी  आणि मॅक्लम टर्नबुल यांनी संयुक्त पत्रकार घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी टर्नबुल यांना विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांचं उदाहरण दिलं.
 
तुमचा हा भारत दौरा स्मिथची फलंदाजी आणि इतर कर्णधारांप्रमाणे फलदायी ठरेल, अशी मला आशा आहे, असं मोदी पंतप्रधान मॅक्लम टर्नबुल यांना म्हणाले.“गेल्या महिन्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये आपण रोमांच पाहिला. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत   2014 मध्ये दिलेल्या भाषणात मी महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर यांचा उल्लेख केला होता. आज भारतात विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियात स्मिथ युवा क्रिकेट संघाला आकार देत आहे.” 
 
टर्नबुल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवादाविरोधात लढण्यासाठी एकूण सहा करारांवर स्वाक्षरी केली. आज सकाळी राष्ट्रपती भवनात टर्नबुल यांचं औपचारिक स्वागत झालं. यावेळी या दौऱ्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियामधील संबंध आणखी बळकट होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतासोबत एकत्र येऊन आम्हाला पूर्वीपेक्षा आणखी चांगलं काम करायचं आहे, मोदी विकासाच्या मार्गावर या उत्कृष्ट देशाचं नेतृत्त्व करत आहे. भारताची कामगिरी जगासाठी उदाहरण आहे, असं ते म्हणाले.”
 

Web Title: Kohli's example was given by Modi to the Prime Minister of Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.