रेल्वे गाड्यांमध्ये कोकम सरबत

By admin | Published: December 21, 2014 01:24 AM2014-12-21T01:24:36+5:302014-12-21T01:24:36+5:30

गोव्याचे कोकम सरबत पुरविण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली जावी, ही गोव्याचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना केलेली विनंती मान्य झाली आहे.

Kokil syrup in the trains | रेल्वे गाड्यांमध्ये कोकम सरबत

रेल्वे गाड्यांमध्ये कोकम सरबत

Next

पणजी : कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये प्रवासी वर्गाला गोव्याचे कोकम सरबत पुरविण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था केली जावी, ही गोव्याचे पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना केलेली विनंती मान्य झाली आहे.
पहिल्या टप्प्यात मुंबई ते गोवा या विशेष पर्यटन रेल्वेत पर्यटकांना कोकम सरबत पुरविले जाईल, असे परुळेकर यांनी सांगितले. थिवी ते करमळीपर्यंतच्या प्रवासावेळी आपल्याला प्रभू यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये कोकम सरबत पुरविण्यासाठी आपण मान्यता देऊ, असे प्रभू यांनी सांगितल्याचे परुळेकर म्हणाले.
अनेक पर्यटक असे असतात ते विमानाने गोव्यात येऊ शकत नाही.त्यांच्यासाठी मुंबई- गोवा ही पर्यटक रेल्वे वरदान ठरेल. गोव्यातील हस्तकारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंची रेल्वे स्थानकांवर विक्री करता यावी म्हणून स्थानकांवर
जागा उपलब्ध करावी, अशीही
मागणी आपण केली. प्रभू यांनी तिही मान्य केली आहे. महिलांच्या स्वयंसाहाय्य गटांकडून ही विक्री केली जाईल. गोव्याच्या हस्तकला त्यामुळे सर्वत्र पोहचतील, असे ते म्हणाले. (खास प्रतिनिधी)

Web Title: Kokil syrup in the trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.