कोलकाता प्रकरण: संदीप घोष यांना अटक, १५ दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 11:06 PM2024-09-02T23:06:57+5:302024-09-02T23:08:02+5:30

Kolkata College Case News: सीबीआयकडून संदीप घोष यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली जात आहे.

kolkata college case ex principle sandeep ghosh arrested cbi action after 15 days of investigation | कोलकाता प्रकरण: संदीप घोष यांना अटक, १५ दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई

कोलकाता प्रकरण: संदीप घोष यांना अटक, १५ दिवसांच्या चौकशीनंतर सीबीआयची कारवाई

Kolkata College Case News: कोलकाता आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील घटनेवरून अद्यापही देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. अशा प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी ममता बॅनर्जी सरकार एक विधेयक आणत आहे. हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सुमारे १५ दिवसांच्या चौकशीनंतर या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना अटक केली आहे. 

संदीप घोष यांना सीजीओ कॉम्प्लेक्समधून कोलकाता येथील निजाम पॅलेस येथील सीबीआय कार्यालयात नेण्यात आले. सीबीआयचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संदीप घोष यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत आहे. हे युनिट निजाम पॅलेसच्या कार्यालयात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक युनिटने घोष यांना आरजी कार हॉस्पिटलमधील आर्थिक अनियमिततेच्या आरोपाखाली अटक केली आहे.

सीबीआयने एफआयआरमध्ये कथित आर्थिक अनियमिततेबाबतचे  कलम आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीबीआय गेल्या १५ दिवसांपासून संदीप घोष यांची चौकशी करत आहे. संदीप घोष यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व माहिती जाणून घेण्यासाठी सीबीआयने संदीपची दोनदा पॉलीग्राफ चाचणीही केली आहे. त्याच्याशिवाय इतर ६ जणांचीही चाचणी करण्यात आली आहे. 

संदीप घोष यांना रुग्णालयातील पायाभूत सुविधा, मृतदेहांचे जतन आणि शवविच्छेदन करण्यात सहभागी असलेल्या प्रोटोकॉलबद्दल चौकशी करण्यात आली. पाच सदस्यीय पथकाने रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.
 

Web Title: kolkata college case ex principle sandeep ghosh arrested cbi action after 15 days of investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.