पोलिसांची गाडी, हातात शस्त्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरात घुसलेल्या तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 02:04 PM2023-07-21T14:04:41+5:302023-07-21T14:04:54+5:30
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील निवासस्थानाजवळ एका तरुणाने शस्त्र घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला.
आज पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संरक्षणात मोठी चूक झाल्याचे समोर आले. बॅनर्जी यांच्या घरात एका सशस्त्र तरुणाने चाकू घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी लिहिलेल्या वाहनात आरोपी तरुण पोहोचला होता. पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी तरुणाला थांबवून चौकशी केली आणि संशयावरून त्याची झडती घेतली आणि त्याला अटक केली. झडतीदरम्यान तरुणाकडून चाकू जप्त करण्यात आला. त्याच्याकडून एक संशयास्पद बॅगही जप्त करण्यात आली आहे.
मणिपूरच्या घटनेवरुन संसदेत गोंधळ; लोकसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब
पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीला कालीघाट पोलीस ठाण्यात नेले असून त्याची चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहन मालक नूर हमीम असं नाव असल्याचे बोलले जात आहे.
तरुणाच्या अटकेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सीएम ममता बॅनर्जी यांच्या घराभोवती आधीच कडेकोट सुरक्षा व्यवस्था असून एवढी सुरक्षा असतानाही एक तरुण शस्त्र घेऊन आल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज २१ जुलै तृणमूल काँग्रेस शहीद दिन पाळत आहे. कोलकाता येथील धर्मतळा येथे मिरवणूक काढण्यात आली आहे. त्या बैठकीत ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे प्रमुख नेते निवेदन करतील.