"ममता बॅनर्जींची पॉलीग्राफ टेस्ट करा"; कोलकाता प्रकरणावरून भाजपाचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 04:41 PM2024-08-27T16:41:56+5:302024-08-27T16:42:57+5:30

Kolkata Doctor Case And Mamata Banerjee : कोलकाता हत्या प्रकरणी भाजपाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेरलं आहे.

Kolkata Doctor Case BJP gaurav bhatia asks to conduct polygraph test on Mamata Banerjee | "ममता बॅनर्जींची पॉलीग्राफ टेस्ट करा"; कोलकाता प्रकरणावरून भाजपाचा जोरदार हल्लाबोल

"ममता बॅनर्जींची पॉलीग्राफ टेस्ट करा"; कोलकाता प्रकरणावरून भाजपाचा जोरदार हल्लाबोल

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर देशभरात संताप व्यक्त होत आहे. या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणी भाजपानेपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना घेरलं आहे.

भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर कोलकाता पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गौरव भाटिया यांनी केली आहे.

गौरव भाटिया म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पोलीस आयुक्तांची पॉलीग्राफ टेस्ट व्हायला हवी. गौरव भाटिया यांनी नबन्ना येथील विद्यार्थ्यांची रॅली रोखल्याबद्दल ममता सरकारवरही हल्लाबोल केला आणि जे सत्याच्या पाठीशी उभे आहेत त्यांच्यावर पोलीस कारवाई करत आहेत असं म्हटलं. 

"मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची पश्चिम बंगालमध्ये हुकूमशाही पाहायला मिळत आहे. आंदोलन शांततेत होत आहे पण ममता हुकूमशाह असून त्यांची भूमिका आरोपींच्या पाठीशी उभी राहण्याची आहे. बंगालमध्ये माता-भगिनी सुरक्षित नाहीत."

"सत्य बाहेर आले पाहिजे. सत्य दाबलं जाऊ शकत नाही आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे लोक आपल्या पदावर बसून विद्यार्थ्यांना चिरडत आहेत, संविधानाचा अपमान करत आहेत, हे खपवून घेतलं जाणार नाही, हा मुद्दा आज जसा उचलला गेला आहे तसाच तो पुढेही उचलला जाईल" असं गौरव भाटिया यांनी सांगितलं. 
 

Web Title: Kolkata Doctor Case BJP gaurav bhatia asks to conduct polygraph test on Mamata Banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.