"बंगालमध्ये गुंड, अराजकता..."; कोलकाता प्रकरणावरून भाजपा नेत्याने ममता बॅनर्जींना घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 03:49 PM2024-08-30T15:49:32+5:302024-08-30T15:50:33+5:30

व्हीडी शर्मा यांनी कोलकाता येथील महिला डॉक्टर हत्येच्या घटनेवरून ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

kolkata doctor case bjp state president vd sharma attacked Mamata Banerjee said goons era in bengal | "बंगालमध्ये गुंड, अराजकता..."; कोलकाता प्रकरणावरून भाजपा नेत्याने ममता बॅनर्जींना घेरलं

"बंगालमध्ये गुंड, अराजकता..."; कोलकाता प्रकरणावरून भाजपा नेत्याने ममता बॅनर्जींना घेरलं

भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्व अभियानाच्या संदर्भात मध्य प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा गुरुवारी सीहोर येथे पोहोचले. येथे त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित केलं. याच दरम्यान व्हीडी शर्मा यांनी कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेवरून ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

व्हीडी शर्मा म्हणाले की, "पश्चिम बंगालमध्ये गुंड आणि अराजकता सुरू आहे. आंदोलन केल्यावर टीएमसीचे गुंड गोळीबार करतात. पश्चिम बंगालमधील घटनेने राष्ट्रपतीही दुखावल्या आहेत. असं असतानाही विरोधक खोटं, फसवेगिरीचं राजकारण करत आहेत. पण देशातील जनतेला ते आता चांगलंच समजलं आहे."

भाजपच्या सदस्यत्व मोहिमेबाबत व्हीडी शर्मा म्हणाले की, राज्यात दीड कोटी सदस्य बनवण्याचं आमचं लक्ष्य आहे. संपूर्ण देशात जास्तीत जास्त सदस्य घेऊन प्रथम येण्याचा प्रयत्न करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब कल्याण, विकास आणि लोककल्याणकारी धोरणांचा आज देशातील प्रत्येक सामाजिक वर्गावर परिणाम झाला आहे. 

31 ऑगस्ट रोजी बूथवर आयोजित केलेल्या कार्यशाळेत भाजपा कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन रणनीती बनवून घरोघरी संपर्क साधून जास्तीत जास्त सदस्य बनवावेत. भाजपाची सर्वात मोठी ताकद बूथ कार्यकर्ते आणि बूथ कमिटी आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह यापूर्वी अहमदाबादमधील एका बूथचे अध्यक्ष राहिले आहेत. आपण सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या बूथवर किमान २०० सभासद करून जिल्ह्याने साध्य केलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक सभासद करून राज्यात इतिहास घडवावा असंही म्हटलं आहे. 

Web Title: kolkata doctor case bjp state president vd sharma attacked Mamata Banerjee said goons era in bengal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.