खळबळजनक! आरजी कर हॉस्पिटलमध्ये आंदोलनाच्या ठिकाणी बेवारस बॅग, बॉम्ब स्क्वॉड दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 02:32 PM2024-09-12T14:32:13+5:302024-09-12T14:33:20+5:30

Kolkata Doctor Case : आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलजवळ एक संशयास्पद बेवारस बॅग सापडली आहे. आंदोलकांनी आंदोलनासाठी उभारलेल्या निषेध मंचाजवळ ही बॅग आढळून आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

Kolkata Doctor Case suspicious unclaimed bag located at rg kar madical college hospital kolkata | खळबळजनक! आरजी कर हॉस्पिटलमध्ये आंदोलनाच्या ठिकाणी बेवारस बॅग, बॉम्ब स्क्वॉड दाखल

फोटो - आजतक

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलजवळ एक संशयास्पद बेवारस बॅग सापडली आहे. आंदोलकांनी आंदोलनासाठी उभारलेल्या निषेध मंचाजवळ ही बॅग आढळून आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहितीनंतर बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. आता बॉम्बशोधक पथकाच्या तपासानंतरच बॅगेत काय आहे हे समजेल. 

पोलीस सध्या ही बॅग येथे नेमकी कोणी ठेवली आहे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रेनी डॉक्टरसोबत बलात्कार-हत्येच्या घटनेनंतर कोलकाताचे आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सतत चर्चेत आहे. आरजी कार मेडिकल कॉलेजच्या माजी प्रिन्सिपल संदीप घोषची चौकशी सुरू आहे. ईडीने त्याच्या घरासह अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे.  

हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट रोजी ट्रेनी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तसेच तिच्या पालकांना देखील सुरुवातीला डॉक्टरने आत्महत्या केल्याचं खोटं सांगितलं. मात्र नंतर बलात्कार असल्याचं समोर आलं. या घटनेनंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला अटक केली आहे.

"त्यांच्या कुटुंबात असं घडलं असतं तर ममतांनी असं म्हटलं असतं का?"

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता निर्भया प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं त्याबद्दल डॉक्टरच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी यांनी केलेल्या आवाहनावर आता मुलीच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. ममता बॅनर्जींनी लोकांना निदर्शनांपासून लक्ष हटवून दुर्गापूजेवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं आहे. 

ममता यांच्या विधानाबाबत पीडितेच्या वडिलांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "आम्हाला असं वाटतं की, यावर्षी कोणीही दुर्गापूजा साजरी करणार नाही. जर कोणी साजरी केली तर ते आनंदाने साजरे करणार नाहीत, कारण बंगाल आणि देशातील सर्व लोक माझ्या मुलीला आपली मुलगी मानत आहेत." ट्रेनी डॉक्टरच्या आईने ममता बॅनर्जी यांनी 'दुर्गा पूजे'वर केलेल्या विधानाला असंवेदनशील म्हटलं आहे.

Web Title: Kolkata Doctor Case suspicious unclaimed bag located at rg kar madical college hospital kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.