ममता म्हणाल्या, "बंगालमध्ये आग लागली तर संपूर्ण ईशांन्य जळेल"; CM हिमंता बिस्वा सरमा यांनी केला पलटवार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 18:32 IST2024-08-28T18:29:46+5:302024-08-28T18:32:31+5:30
ममता म्हणाल्या, "मोदी बाबू आपण आपल्या पक्षाला सांगून जी आग लावत आहात, लक्षात ठेवा, जर बंगालमध्ये आग लावाल तर, आसामही जळेल, पूर्वेकडील राज्यही गप्प राहणार नाहीत. ना उत्तर प्रदेश, ना बिहार, ना ओडिशा गप्प राहतील. दिल्लीही शांत राहणार नाही..."

ममता म्हणाल्या, "बंगालमध्ये आग लागली तर संपूर्ण ईशांन्य जळेल"; CM हिमंता बिस्वा सरमा यांनी केला पलटवार!
पश्चिम बंगालच्या राजधानीत अर्थात कोलकात्यात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येनंतर, संपूर्ण देशात संतापाची लाट आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्ष अर्थात भाजप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. हे प्रकरण आता एवढे तापले आहे की, नेत्यांनी एकमेकांना थेट धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. यातच, कोलकात्याच्या मुद्द्यावर टीएमसी 31 ऑगस्ट 2024 रोजी राज्यातील प्रत्येक ब्लॉकमध्ये आंदोलन करेल, अशी घोषणा सीएम ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
बंगाल बंदवर ममता भडकल्या -
बंगाल बंदसंदर्भात बोलताना सीएम ममता बॅनर्जी म्हणाल्या, "काही लोकांना वाटत आहे की, हा बांगलादेश आहे... मला बांगलादेश आवडतो, तेथील लोकही आमच्यासारखेच बोलतात. बांगलादेश आणि बंगालची संस्कृती एकच आहे. पण लक्षात ठेवा बांगलादेश एक वेगळा देश आहे आणि भारत एक वेगळा देश आहे. मोदी बाबू आपण आपल्या पक्षाला सांगून जी आग लावत आहात, लक्षात ठेवा, जर बंगालमध्ये आग लावाल तर, आसामही जळेल, पूर्वेकडील राज्यही गप्प राहणार नाहीत. ना उत्तर प्रदेश, ना बिहार, ना ओडिशा गप्प राहतील. दिल्लीही शांत राहणार नाही... आपली खुर्चीही हालेल."
Kolkata: CM Mamata Banerjee says, "Remember if Bengal is burned, then Assam, Bihar, Jharkhand, Odisha, and Delhi will also be burned" pic.twitter.com/zwg8ZOnR9p
— IANS (@ians_india) August 28, 2024
हिमंता बिस्वा सरमा यांचा पलटवार -
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ममतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे, "दीदी, आपण आसामला धमकावण्याची हिम्मत कशी झाली? आम्हाला लाल डोळे दाखवू नका. आपल्या अपयशाच्या राजकारणाने भारताला जाळण्याचा प्रयत्नही करू नका. फूट पाडणारी भाषा बोलणे आपल्याला शोभत नाही."