कोलकातामधील रुग्णालयात भीषण आग, 250 रुग्णांना वाचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 10:04 AM2018-10-03T10:04:57+5:302018-10-03T10:11:52+5:30
पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या फार्मसी विभागात आज सकाळी भीषण आग लागली.
कोलकाता - पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या फार्मसी विभागात आज सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णालयामधून सुमारे 250 रुग्णांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त प्राप्त झालेले नाही.
#Visuals: Fire breaks out in the pharmacy department of Kolkata Medical College and Hospital. 10 fire engines and Kolkata police rushed to the spot. All the patients are safe. #Kolkatapic.twitter.com/IX7ENRRpUu
— ANI (@ANI) October 3, 2018
मिळालेल्या माहितीनुसार कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यालयातील फार्मसी विभागात बुधवारी सकाळी आग लागली. आगीच्या ज्वाळा पाहून तेथे उपस्थित असलेल्यांचा गोंधळ उडाला. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे दहा बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. सध्या अग्निशन दलाकडून आग शमवण्याचे काम सुरू आहे. तसेच स्थानिक पोलीस घटनास्थळी उपस्थित आहेत.
#Visuals: Firefighting operation underway at Kolkata Medical College and Hospital #Kolkatapic.twitter.com/hfU2Ggp0r2
— ANI (@ANI) October 3, 2018
स्थानिक वृत्तवाहिन्यांमध्ये येत असलेल्या वृत्तानुसार वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेले सर्व रुग्ण सुरक्षित असून, आग लागल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तत्परता दाखवत सुमारे 250 रुग्णांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले.