मेट्रोमध्ये जोडप्याला मारहाण प्रकरण; घटनेच्या विरोधात निदर्शनं करणाऱ्या तरुणींशी छेडछाड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 06:16 PM2018-05-05T18:16:54+5:302018-05-05T18:16:54+5:30
जोडप्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
कोलकाता- कोलाकाता मेट्रोमध्ये मिठी मारणाऱ्या एका जोडप्याला मेट्रोतील काही वरिष्ठ सहप्रवाशांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. या जोडप्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ कोलकातमध्ये ठिकठिकाणी निदर्शनं करण्यात आली. शनिवारी (ता.5मे) रोजी कोलकातामध्ये काही जणांनी या घटनेच्या विरोधात निदर्शन केली. यावेळी निदर्शनात सहभागी झालेल्या तीन मुलींशी अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्याची घटना घडली आहे. 'आम्ही शांततेत निदर्शन करत असताना एक व्यक्ती तिथे आला व त्याने आम्हाला शिव्या देत छेडछाड करायला सुरूवात केली. जेव्हा या मुलींनी त्याला बोलायला सुरूवात केली तेव्हा तो आरोपी मुलींना धक्का देऊन निघून गेला, असं पीडित मुलींनी सांगितलं आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातो आहे.
Kolkata: 3 women allegedly abused & molested by unknown person during a protest against a couple being beaten up in a metro. Victim says, 'Our protest was peaceful when a man came in & began abusing us. When I tried to talk to him he pushed me.' #WestBengalpic.twitter.com/tfbNjnu9pW
— ANI (@ANI) May 5, 2018
काही दिवसांपूर्वी कोलकाता मेट्रोमध्ये मिठी मारणाऱ्या एका जोडप्याला मारहाणीची घटना घडली होती. या जोडप्याने मेट्रोत मिठी मारल्याने तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी त्यांच्या संस्कारांचा उद्धार करत डम-डम मेट्रो स्टेशनवर त्यांना उतरवून मारहाण केली. या घटनेचा कोलकाता मेट्रोसह स्थानिकांनीही निषेध केला.
कोलकाता मेट्रोचं हे प्रकरण संपूर्ण शहरात चर्चेचा विषय आहे. या घटनेनंतर कोलकातामधील तरुणांना घटनेचा निषेध करत फ्री हग कॅम्पेन सुरू केलं. या कॅम्पेनमध्ये सहभागी झालेल्या तरुणांनी एकमेकांना मिठ्या मारत घटनेचा निषेध केला.