कोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार! संदीप घोष याच्या पॉलिग्राफी चाचणीला मान्यता,फक्त ४ डॉक्टरांची चाचणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 07:12 PM2024-08-22T19:12:29+5:302024-08-22T19:12:59+5:30

कोलकाता येथील महिला डॉक्टरच्या हत्येनंतर देशभरात निदर्शने सुरू आहेत. या प्रकरणी आता ४ डॉक्टरांचीही चाचणी होणार आहे.

Kolkata rape case will be revealed Approval of Sandeep Ghosh's polygraphy test, only 4 doctors will be tested | कोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार! संदीप घोष याच्या पॉलिग्राफी चाचणीला मान्यता,फक्त ४ डॉक्टरांची चाचणी होणार

कोलकाता बलात्कार प्रकरणाचा खुलासा होणार! संदीप घोष याच्या पॉलिग्राफी चाचणीला मान्यता,फक्त ४ डॉक्टरांची चाचणी होणार

कोलकाता येथील महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सीबीआयने गेल्या काही दिवसापासून तपास सुरू केलाय. सीबीआयने आरजी कर कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांना गुरुवारी सियालदह न्यायालयात हजर केले होते, त्यानंतर न्यायालयाने आता संदीप घोषच्या पॉलिग्राफी चाचणीला मान्यता दिली आहे. याशिवाय चार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची पॉलिग्राफी चाचणीही केली जाणार आहे.

८-९ ऑगस्टच्या रात्री घडलेल्या कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणाचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही. या कारणास्तव सीबीआयला संजय रॉय, संदीप घोष आणि त्या चार डॉक्टरांची पॉलीग्राफ चाचणी करायची आहे, या घटनेच्या रात्री या डॉक्टरांनी महिला डॉक्टरसोबत रात्री जेवण केले होते. हे लोक चौकशीदरम्यान खरे बोलत नाहीत किंवा काहीतरी लपवत आहेत, असा संशय सीबीआयला आहे. 

पोस्टमार्टेम हाऊसमध्ये गर्लफ्रेंडसोबत चाळे करत होता सफाई कर्मचारी, व्हिडीओ व्हायरल

गेल्या ७ दिवसांच्या चौकशीदरम्यान संदीप घोष याने दिलेली उत्तरावरुन सीबीआयला संशय आहे. ते चार डॉक्टर सीबीआयसाठी महत्त्वाचे आहेत कारण संजय रॉय यांच्याशिवाय त्यांनीच त्या रात्री पीडितेला जिवंत पाहिले होते. मुख्य आरोपीने आपला गुन्हा कबूल केला, पण मुख्य आरोपी संजय रॉय आणि त्याच्या उत्तरावर सीबीआयला संशय आहे.

पॉलीग्राफ चाचणीद्वारे हत्येच्या रात्री काय झालं याची माहिती मिळू शकते. त्या रात्री त्या चौघांमध्ये काय बोलणं झालं याची माहिती मिळू शकते. 

Web Title: Kolkata rape case will be revealed Approval of Sandeep Ghosh's polygraphy test, only 4 doctors will be tested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.