हॉस्पिटलवर हल्ला करण्यामागे भाजपा आणि डाव्यांचा हात, ममता बॅनर्जींचा आरोप, पोलिसांनी प्रसिद्ध केले संशयितांचे फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 07:59 PM2024-08-15T19:59:08+5:302024-08-15T19:59:45+5:30

Kolkata Rape & Murder case: पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच काल रात्री या मेडिकल कॉलेजमध्ये जमावाने घुसून मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती.

Kolkata Rape & Murder case: Mamata Banerjee alleges BJP and Left behind attack on hospital, police releases photos of suspects  | हॉस्पिटलवर हल्ला करण्यामागे भाजपा आणि डाव्यांचा हात, ममता बॅनर्जींचा आरोप, पोलिसांनी प्रसिद्ध केले संशयितांचे फोटो 

हॉस्पिटलवर हल्ला करण्यामागे भाजपा आणि डाव्यांचा हात, ममता बॅनर्जींचा आरोप, पोलिसांनी प्रसिद्ध केले संशयितांचे फोटो 

पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच काल रात्री या मेडिकल कॉलेजमध्ये जमावाने घुसून मोठ्या प्रमाणात नासधूस केली होती. दरम्यान, काल रात्री आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये झालेला हल्ला आणि तोडफोडीप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांवर गंभीर आरोप केला आहे.

या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, या घटनेसाठी मी विद्यार्थ्यांना किंवा डॉक्टरांना दोष देणार नाही. मात्र काही राजकीय पक्षांनी आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न केला. पोलीस या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. माझी विद्यार्थी आणि आंदोलनकर्ते डॉक्टर यांच्याबाबत कुठलीही तक्रार नाही आहे. मात्र काही राजकीय पक्ष वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हिडीओ पाहिल्यास तिथे काय घडलं, हे तुम्हाला कळेल, असा दावा ममता बॅनर्जी यांनी केला. 

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, मला मिळालेल्या माहितीनुसार बाहेरील लोकांनी  डावे आणि भाजपासारख्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मिळून हे सर्व घडवून आणले. यामध्ये विद्यार्थ्यांची काहीही भूमिका नाही आहे. मी या घटनेचा निषेध करते. तसेच आरोपीला फाशी व्हावी यासाठी मी उद्या मोर्चा काढणार आहे, अशी घोषणाही ममता बॅनर्जी यांनी केली.  

त्या पुढे म्हणाल्या की, मी कालची घटना पाहिली आहे. कधी कधी समाजात अशा गोष्टी घडतात. मात्र आपण त्याचं समर्थन करू शकत नाही. उत्तर प्रदेशमध्येही एक घटना घडली घडली होती. याआधी उन्नाव आणि इतर राज्यांमध्येही अशा घटना घडल्याचं आपण पाहिलं आहे. हा गुन्हा फाशी देण्याच्याच पात्रतेचा आहे. दरम्यान, कोलकाता पोलिसांनी  त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट टाकून संशयितांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.  

Web Title: Kolkata Rape & Murder case: Mamata Banerjee alleges BJP and Left behind attack on hospital, police releases photos of suspects 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.