Koregaon Bhima violence : कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक, 3 अल्पवयीन आरोपींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 12:49 PM2018-01-09T12:49:56+5:302018-01-09T15:09:21+5:30

कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे.

Koregaon Bhima violence: 12 people arrested in Koregaon-Bhima violence | Koregaon Bhima violence : कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक, 3 अल्पवयीन आरोपींचा समावेश

Koregaon Bhima violence : कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक, 3 अल्पवयीन आरोपींचा समावेश

Next

पुणे - कोरेगाव-भीमा हिंसाचाराप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. कोरेगाव-भीमा, सणसवाडी, कोंढापुरी परिसरातून या 12 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या 12 जणांपैकी 3 जण अल्पवयीन अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्रापूर न्यायालयासमोर सर्वांना हजर करण्यात आले होते. यावेळी 9 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा येथील जाळपोळ आणि दगडफेकीचा प्रकार तसेच वढू बुद्रुक येथे 29 डिसेंबर रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन्ही गटांचे आरोपी आहेत. त्यांना कोरेगाव भीमा, सणसवाडी व कोंढापुरी येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दंगल माजवणे, जाळपोळ, दगडफेक तसेच सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे आदी कलमांतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.

घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे. एक स्वतंत्र पथक आरोपींबाबत माहिती घेत आहे. कोरेगाव भीमातील या घटनेच्या तपासासाठी सुमारे चारशे पोलिसांचे बळ तैनात ठेवण्यात आलेले आहे. पोलिसांनी आरोपींच्या नावाबाबत गुप्तता बाळगली आहे.

चौकशीसाठी सांगलीत मोर्चा : कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हल्ल्याची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सीबीआयतर्फे चौकशी करावी. दलितांवर झालेल्या अमानुष हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करावी, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले गट) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातून कार्यकर्ते सहभागी झाले होते. रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी महापौर विवेक कांबळे आणि जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

जाणून घ्या काय आहे भीमा-कोरेगाव प्रकरण?

पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. रस्त्यावरील गर्दीतून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यवसान दगडफेक व जाळपोळीत झालं.
सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणाऱ्या सणसवाडी गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला.

सणसवाडीतील वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली. 
दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले.

Web Title: Koregaon Bhima violence: 12 people arrested in Koregaon-Bhima violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.