नातवाला संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजी-आजोबाने ट्रेन समोर उडी घेऊन केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 09:43 AM2021-05-03T09:43:16+5:302021-05-03T10:09:06+5:30

Fear of covid-19 : रविवारी कुटुंबीयांना काहीही न सांगता हे दाम्पत्य घरातून निघून गेले. त्यानंतर त्यांनी कोटाहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या केली.

kota corona s awe elderly couple committed suicide in coaching city | नातवाला संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजी-आजोबाने ट्रेन समोर उडी घेऊन केली आत्महत्या 

नातवाला संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजी-आजोबाने ट्रेन समोर उडी घेऊन केली आत्महत्या 

Next
ठळक मुद्देराजस्थानमधील कोटा शहरात सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. येथील पोलीस खात्यामधील ६०० हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी आतापर्यंत कोरोनाने बाधित झाले आहेत.

कोटा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. दररोज भारतात तीन लाखांच्यावर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यातच देशातील कोचिंग सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. याठिकाणी कोरोनाची लागण झालेल्या एका वृद्ध दाम्पत्याने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. कारण, आपल्यामुळे आपल्या नातवालाही कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीपोटी दाम्पत्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. (kota corona s awe elderly couple committed suicide in coaching city)

या घटनेची संपूर्ण शहरामध्ये चर्चा सुरु असून या दाम्पत्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.  यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिले आहे. त्यानुसार, पोलीस उपाधीक्षक भगवत सिंह हिंगड यांनी सांगितले की, संबंधित घटना रविवारी सायंकाळी घडली. येथील  रेल्वे कॉलनी परिसरात राहणारे हीरालाल बैरवा (वय ७५) आणि त्यांची पत्नी शांती बैरवा (वय ७५) यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे दोघेही तणावाखाली होते. त्यांनी घरीच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपल्यामुळे आपला नातू रोहित याला कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती त्यांना वाटत होती.

(CoronaVirus News : अमेरिकेकडून वैद्यकीय मदत, रेमडेसिविरच्या १२५००० कुपी भारतात दाखल)

मुलाचे आठ वर्षापूर्वी निधन
रविवारी कुटुंबीयांना काहीही न सांगता हे दाम्पत्य घरातून निघून गेले. त्यानंतर त्यांनी कोटाहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या केली. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर रेल्वे कॉलनी पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी या दोघांचेही मृतदेह एमबीएस रुग्णालयामध्ये नेले. येथील शवगृहामध्ये हे मृतदेह ठेवण्यात आले. त्यानंतर प्राथमिक तपास केल्यानंतर या दाम्पत्याच्या मुलाचे आठ वर्षापूर्वी निधन झाल्याची माहिती मिळाली. तसेच, आपल्यामुळे नातवाला कोरोनाचा संसर्ह होईल, अशी भीती या दोघांच्या मनात होती, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

कोटामध्ये कोरोनाची स्थिती गंभीर
राजस्थानमधील कोटा शहरात सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. येथील पोलीस खात्यामधील ६०० हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी आतापर्यंत कोरोनाने बाधित झाले आहेत. शहरातील सर्वच रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: kota corona s awe elderly couple committed suicide in coaching city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.