आयसीयूत सुरू होते उपचार, अचानक ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 08:40 PM2023-07-14T20:40:42+5:302023-07-14T20:41:15+5:30

आयसीयूत रुग्णाला अचानक हृदयविकाराचा झटका आला, उपचारादरम्यान घडली दुर्दैवी घटना.

kota-medical-college-hospital-a-patient-died-after-his-oxygen-mask-caught-fire | आयसीयूत सुरू होते उपचार, अचानक ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाचा होरपळून मृत्यू

आयसीयूत सुरू होते उपचार, अचानक ऑक्सिजन मास्कला लागली आग; रुग्णाचा होरपळून मृत्यू

googlenewsNext


कोटा : एखाद्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाची संपूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी त्या रुग्णालयाची असते. पण, कधी-कधी रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे रुग्ण अडचणीत येतो किंवा जीवही जाऊ शकतो. यापूर्वी अनेकदा अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. आता राजस्थानच्या कोटामधून अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. 

कोटा येथील वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णालयात बुधवारी रात्री आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णाला हृदयविकाराच्या झटक्यानंतर डॉक्टर सीपीआर देत होते. यावेळी रुग्णाच्या ऑक्सिजन मास्कला करंट लागल्याने आग लागली आणि रुग्णाचा चेहरा व मान भाजले, या घटनेत त्या रुग्णाचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाच्या मास्कने पेट घेतल्यावर त्याला वाचवण्याऐवजी कर्मचारी आयसीयूमधून पळून गेले. 

गुरुवारी हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी रुग्णालय व्यवस्थापनावर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला. या घटनेत अनंतपुरा तालाब गावात राहणारा 30 वर्षीय वैभव याचा मृत्यू झाला. वैभवचा भाऊ गौरवनेच आयसीयूतील आग विझवली, मात्र तोपर्यंत वैभवचा मृत्यू झाला होता. भावाने सांगितले की, ऑक्सिजन मास्कला आग लागल्याने मास्क पूर्णपणे वैभवच्या चेहऱ्याला चिकटला होता.

वैभवच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासही नातेवाईकांनी नकार दिला. दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसोबतच नुकसान भरपाईच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. यावेळी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Web Title: kota-medical-college-hospital-a-patient-died-after-his-oxygen-mask-caught-fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.