‘कोटक’चा शाखा व्यवस्थापक अटकेत

By admin | Published: December 29, 2016 03:31 AM2016-12-29T03:31:30+5:302016-12-29T03:31:30+5:30

कोटक बँकेच्या के. जी. मार्ग शाखेचा व्यवस्थापक आशिष कुमार याला हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) सक्त वसुली संचालनालयाने (ईडी)

Kotak branch manager suspended | ‘कोटक’चा शाखा व्यवस्थापक अटकेत

‘कोटक’चा शाखा व्यवस्थापक अटकेत

Next

नवी दिल्ली : कोटक बँकेच्या के. जी. मार्ग शाखेचा व्यवस्थापक आशिष कुमार याला हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली (पीएमएलए) सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीनंतर मंगळवारी रात्री अटक केली. कुमार याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर या बँकेतील नऊ बनावट खात्यांमध्ये ३४ कोटी रुपये जमा करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. आशिष कुमारला पुढील कोठडी मिळण्यासाठी न्यायालयात हजर केले जाईल.
आशिष कुमारला आम्ही आधीच निलंबित केले आहे, असे बँकेने निवेदनात म्हटले. कोटक महिंद्र बँकेने त्या वादग्रस्त खात्यांबाबत आर्थिक गुप्तचर शाखेला तातडीने माहिती दिली आणि बँकेने आधीच आशिष कुमारला निलंबित केले आहे. बँकेच्या आचार संहितेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अजिबात गय केली जात नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाते, असे बँकेचे प्रवक्ते रोहीत राव यांनी म्हटले.
या ३४ कोटींच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर त्याची दखल घेऊन ईडीने हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला.

Web Title: Kotak branch manager suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.