केरोसीन अंगावर ओतून स्टंट करण्याच्या नादात गमावला जीव

By admin | Published: April 12, 2016 05:26 PM2016-04-12T17:26:52+5:302016-04-12T18:12:49+5:30

स्टंट करण्याच्या नादात आगीत भाजलेल्या 19 वर्षीय तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिऍलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी जलील-उद-दीन स्टंटची प्रॅक्टीस करत होता

Kreosin lost body in stomach to stunts | केरोसीन अंगावर ओतून स्टंट करण्याच्या नादात गमावला जीव

केरोसीन अंगावर ओतून स्टंट करण्याच्या नादात गमावला जीव

Next
ऑनलाइन लोकमत - 
हैद्राबाद, दि. १२ - स्टंट करण्याच्या नादात आगीत भाजलेल्या 19 वर्षीय तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिऍलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी जलील-उद-दीन स्टंटची प्रॅक्टीस करत होता. स्टंट करत असताना आपण तो कसा केला आहे हे पाहण्यासाठी त्याने गल्लीतल्या लहान मुलांना मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला होतं. मात्र स्टंटमध्ये झालेल्या चुकीमुळे जलील-उद-दीनला आपला जीव गमवावा लागला आहे. 
 
जलील-उद-दीनला 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिऍलिटी शोमध्ये सहभागी व्हायचं होतं. आपण तरबेज नसतानाही त्याने स्टंट करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जलील-उद-दीनने अगोदर आपल्या तोंडात केरोसीन घेऊन आगीचे भडके उडवले. त्यानंतर सगळ्या अंगावर केरोसीन ओतून घेतलं आणि स्वत:ला आग लावून घेतली ज्यामध्ये जलील-उद-दीन भाजला गेला. परिस्थिती हाताबाहेर गेलेली पाहून लहान मुलांनीदेखील तेथून पळ काढला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
जलील-उद-दीनला रुग्णालयात उपचारासाठी उस्मानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज मंगळवारी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जलीलच्या आई-वडिलांना मात्र त्याला अशा कोणत्या रिऍलिटी शोमध्ये सहभागी होण्याबद्दल काही कल्पना नव्हती. मृत्युपूर्वी जलीलने आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचं पोलिसांना सांगितलं आहे.
 

Web Title: Kreosin lost body in stomach to stunts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.