"बायको 30-35 वेळा पळून गेली", 6 महिन्यांच्या मुलीला घेऊन भीक मागणाऱ्या व्यक्तीने मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 01:03 PM2023-01-06T13:03:59+5:302023-01-06T13:04:50+5:30
कडाक्याच्या थंडीत हातात बॅनर घेऊन एक व्यक्ती आपल्या दोन लहान मुलांसह रस्त्यावर भीक मागत आहे.
नवी दिल्ली : बिहारच्या कैमूर जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीत हातात बॅनर घेऊन एक व्यक्ती आपल्या दोन लहान मुलांसह रस्त्यावर भीक मागत आहे. त्याने हातात घेतलेल्या बॅनरवर लिहले आहे की, "आपला देश स्वतंत्र आहे, पण आपण पुरुष स्वतंत्र नाही आहोत, हौस नाही, मजबुरी आहे, मुलांचे संगोपन आवश्यक आहे. द्यायचं असेल तर काम द्या नाहीतर दान द्या." कृष्ण मुरारी गुप्ता आपल्या 4 वर्षांचा मुलगा अंश गुप्ता आणि 6 महिन्यांच्या मुलीला मांडीवर घेऊन रस्त्यावर फिरत आहेत.
भीक मागणाऱ्या व्यक्तीने मांडली व्यथा
कृष्ण मुरारी गुप्ता यांनी सांगितले की, ते मुंबईतील एका रूग्णालयात कामाला होते. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांचे लग्न झाले, त्याच्यानंतर त्यांना एक मुलगा झाला जो 4 वर्षांचा आहे. यानंतर पत्नी त्यांच्याशी भांडू लागली आणि नंतर अचानक पळून गेली. पोलिसांनी समजूत काढली आणि पत्नी माघारी घरी आली. यादरम्यान त्यांना मुलगी झाली पण तिच्या जन्मानंतर 15 दिवसांनी पत्नीने मुलीची हत्या केली.
याशिवाय कृष्ण मुरारी गुप्ता यांनी सांगितले की, "एके दिवशी ते त्यांच्या मुलासोबत झोपले असता अचानक पत्नीने लोखंडी पाईप डोक्यावर मारला. ज्यामुळे त्याला मोठी दुखापत झाली. त्यानंतर ती पुन्हा एकदा घरातून पळून गेली आणि आजतागायत परतली नाही. आतापर्यंत ती 30 ते 35 वेळा घरातून पळून गेली आहे."
बायको 30-35 वेळा पळून गेली
कृष्ण मुरारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी 6 महिन्यांची आहे. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य बाहेर राहतात. ते एकटेच त्यांच्या दोन्ही मुलांचे संगोपन करत आहेत. त्यामुळे त्यांना कुठेच काम करता येत नाही. त्यामुळे पोट भरण्यासाठी ते मुलांसोबत भीक मागतात. कृष्ण मुरारी गुप्ता यांच्या पत्नीने त्यांच्यावर हुंडा घेतल्याचा खटला दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"