महुआ मोईत्रा विजयाची हॅट्रिक करणार का?; ममता बॅनर्जींच्या TMC ची प्रतिष्ठेची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 01:15 PM2024-04-11T13:15:09+5:302024-04-11T13:19:31+5:30

West Bengal Loksabha Election 2024: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेस यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. त्यात कृष्णनगर मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात महुआ मोईत्रा यांना तृणमूल काँग्रेसनं पुन्हा उमेदवारी दिली आहे

Krishnanagar Lok Sabha Election 2024 - Mamata Banerjee Trinamool Congress candidate Mahua Moitra to win hat-trick? | महुआ मोईत्रा विजयाची हॅट्रिक करणार का?; ममता बॅनर्जींच्या TMC ची प्रतिष्ठेची लढाई

महुआ मोईत्रा विजयाची हॅट्रिक करणार का?; ममता बॅनर्जींच्या TMC ची प्रतिष्ठेची लढाई

कोलकाता - Mahua Moitra vs BJP ( Marathi News ) मागील २ दशकांपासून तृणमूल काँग्रेसचा गड असलेला कृष्णनगर लोकसभा मतदारसंघात यंदा मोठं आव्हान निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. या मतदारसंघात ममता यांनी पुन्हा एकदा महुआ मोईत्रा यांना उमेदवारी दिली आहे. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे आणि भेट घेतल्याच्या आरोपामुळे महुआ मोईत्रा या देशभरात चर्चेत आल्या होत्या. 

महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिकांकडून पैसे घेतल्याबद्दल संसदीय नैतिकता समितीने त्यांना दोषी ठरविल्यानंतर लोकसभेने त्यांची खासदारकी रद्द केली होती. समितीने मोईत्रा यांचे वर्तन अशोभनीय आणि अनैतिक असल्याचा ठपका ठेवला होता. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी पुन्हा महुआ मोईत्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे ही जागा जिंकणं तृणमूल काँग्रेससाठी प्रतिष्ठेचं बनलं आहे.

कुठल्याही परिस्थितीत या जागेवर विजय मिळवून ममता बॅनर्जींना महुआ मोईत्रावरील आरोपांना जनतेनं नाकारलं हे सिद्ध करायचं आहे. त्यामुळेच पहिल्या टप्प्यातील निवडणूक प्रचार कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून करण्यात आला आहे. तर काहींच्या मते, महुआ मोईत्रा यांना तिकिट देणं ममता बॅनर्जी यांची मजबुरी आहे. जर महुआ यांना तिकिट दिले नसते तर त्यांच्यावरील आरोप खरे आहेत असा समज जनतेचा झाला असता. त्यामुळे महुआ यांना रिंगणात उतरवून प्रचाराला सुरूवात केली आहे.

दरम्यान, यंदा कृष्णानगर मतदारसंघात जबरदस्त लढत पाहायला मिळणार आहे. तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षही या मतदारसंघात ताकदीनं उतरला आहे. भाजपानं याठिकाणी राजा कृष्णचंद्र राय यांचे वंशज अमृता राय यांना उमेदवारी दिली आहे. ज्यांना या भागात राजमाता म्हणून मान्यता आहे. डाव्या विचारांचे माकपानंही आपला जुना गड पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. त्यांनी माजी आमदार एसएम सादी यांना उमेदवारी दिली आहे. सादी यांना काँग्रेसकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. २०१९ च्या निवडणुकीत महुआ मोईत्रा यांनी भाजपाच्या उमेदवाराचा या मतदारसंघात ६३ हजार २१८ मतांनी पराभव केला होता. 
 

Web Title: Krishnanagar Lok Sabha Election 2024 - Mamata Banerjee Trinamool Congress candidate Mahua Moitra to win hat-trick?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.