पोलिसांनी मागितली कृष्ण निवासची माहिती
By admin | Published: August 19, 2015 10:27 PM2015-08-19T22:27:32+5:302015-08-19T22:27:32+5:30
ठाणे : नौपाडा परिसरातील्या कृष्ण निवास इमारत दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी आता ठाणे महापालिका आयुक्तांकडे इमारतीबाबत तज्ज्ञांच्या अभिप्रायासह अहवाल मागितला आहे. त्या आधारावर पुढील कारवाईला गती देता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Next
ठ णे : नौपाडा परिसरातील्या कृष्ण निवास इमारत दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी आता ठाणे महापालिका आयुक्तांकडे इमारतीबाबत तज्ज्ञांच्या अभिप्रायासह अहवाल मागितला आहे. त्या आधारावर पुढील कारवाईला गती देता येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.नौपाडा, बी-केबिन येथील कृ ष्ण निवास ही इमारत अचानक ४ ऑगस्ट, मंगळवारी पहाटे कोसळली होती. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला, तर ७ जण जखमी झाले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल झाला. याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक बारकाईने तपास केला आहे. मात्र अखेरचा पर्याय म्हणून पोलिसांनी याबाबत ठाणे महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देऊन इमारत पडण्याबाबत तज्ज्ञांचा अभिप्राय आणि संबंधित अहवालाबाबत माहिती मागितली आहे. यामध्ये इमारत बांधण्याचा प्लॅन कधी मंजूर केला आहे, त्याप्रमाणे बांधकाम कधी झाले, इमारतीचे मालक कोण होते, त्यांचे नाव व पत्ता काय आहे, इमारत धोकादायक म्हणून घोषित केली होती का, त्याबाबतची कागदपत्रे काय आहेत, इमारत धोकादायक असल्याबाबत मालकांनी अर्ज केला होता का, असल्यास त्याबाबतची कागदपत्रे मिळावीत. तसेच इमारतीच्या शेजारील कमला निवास इमारत विकसित करण्यासाठी पाडण्याचे काम सुरू होते. त्यासाठी ड्रीलिंग मशीनचा वापर करण्यात आला होता. जुनी इमारत पाडण्यासाठी महापालिकेकडे परवानगी घेण्यात आली होती का? ड्रीलिंग मशीनच्या वापरामुळे होणार्या व्हायब्रेशनमुळे शेजारील इमारतींच्या पायावर होणार्या परिणामांची चाचपणी केली होती का? तसेच इमारत अचाकनपणे कोसळण्याची संभाव्य कोणती कारणे आहेत?अशा अनेक महत्वाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात अला आहे. याबाबत, महापालिका कधी माहिती देते, त्यावर पोलीस कारवाई अवलंबून असल्याची माहिती सूत्रांनी दिली.................(प्रतिनिधी)