कशेडी घाटात कारची एसटीला धडक मुंबई - गोवा महामार्ग : लहान मुलाचा मृत्यु

By Admin | Published: September 1, 2015 09:38 PM2015-09-01T21:38:23+5:302015-09-01T21:38:23+5:30

पोलादपूर : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कारची एसटी बसला जोरदार ठोकर लागून झालेल्या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले तर एका लहान मुलाचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भोगाव हद्दीत घडला.

Kshadi Ghat, car stuck in Mumbai - Goa Highway: Child's death | कशेडी घाटात कारची एसटीला धडक मुंबई - गोवा महामार्ग : लहान मुलाचा मृत्यु

कशेडी घाटात कारची एसटीला धडक मुंबई - गोवा महामार्ग : लहान मुलाचा मृत्यु

googlenewsNext
लादपूर : मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कारची एसटी बसला जोरदार ठोकर लागून झालेल्या अपघातात दोघे किरकोळ जखमी झाले तर एका लहान मुलाचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास भोगाव हद्दीत घडला.
बस चालक दिलीप शंकरराव जोंधळे (४०) हा आपल्या ताब्यातील एसटी बस क्र. एमएच २० बीएल ३३४२ घेवून मुंबई ते चिपळूण असा कशेडी घाटातून भोगाव गावच्या हद्दीतून जात असता त्याच दरम्यान राजापूरहून अंधेरी मुंबईकडे जात असलेली कार क्र. एमएच ०५ सीअे ४५३८ या कार चालकाचा अवघड वळणावर ताबा सुटला. त्यामुळे कार चुकीच्या बाजूने जाऊन एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधून प्रवास करणारे प्रकाश शांताराम गुरव (५०), कैलास शांताराम गुरव (४०) हे दोघे किरकोळ जखमी झाले तर ओम कैलास गुरव ( ८) हा लहान मुलगा गंभीर जखमी झाला, हे सर्व अंधेरी येथील रहिवासी आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच कशेडी टॅप, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जगतगुरु स्वामी नरेंद्र महाराज ट्रस्टच्या रुग्णवाहिकेस पाचारण केले. जखमींना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र ओम गुरव याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबई येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान ओमचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: Kshadi Ghat, car stuck in Mumbai - Goa Highway: Child's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.