ईडीच्या छाप्यात कार्ती चिदंबरमकडे आढळला कुबेराचा खजिना

By admin | Published: March 1, 2016 11:36 AM2016-03-01T11:36:37+5:302016-03-01T14:15:14+5:30

माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदमंबरम यांच्याकडे कोटींची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे

Kuber's treasure was discovered by Karti Chidambaram in the ED's raids | ईडीच्या छाप्यात कार्ती चिदंबरमकडे आढळला कुबेराचा खजिना

ईडीच्या छाप्यात कार्ती चिदंबरमकडे आढळला कुबेराचा खजिना

Next
ऑनलाइन लोमकत - 
नवी दिल्ली, दि. १ - माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदमंबरम यांच्याकडे कोटींची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक तसंच जगभरात केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या आधारे त्यांनी ही मालमत्ता उभी केली आहे. एअरसेल - मॅक्सिस घोटाळ्याच्या तपासादरम्यान अंमलबजावणी संचलनालय आणि आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही माहिती उघड झाली आहे. 
 
डेली पायोनिअरने दिलेल्या माहितीनुसार कार्ती चिदंबरम यांनी १४ देशांमध्ये आपली संपत्ती जमा केली असून सर्व ठिकाणी त्यांचे  व्यवसाय सुरु आहेत. यामध्ये लंडन, दुबई, दक्षिण अफ्रिका, फिलिपिन्स, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, फ्रान्स, अमेरिका, स्विझर्लेंड, ग्रीस आणि स्पेन या देशांचा समावेश आहे. 
 
कार्ती चिदंबरम यांनी २००६ ते २०१४ दरम्यान केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या आधारे ही संपत्ती जमा केली आहे. महत्वाचं म्हणजे यादरम्यान पी चिदंबरम यांच्याकडे गृहमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जबाबदारी होती. तपास यंत्रणा १४ देशांना संपर्क साधून यासंबंधी माहिती मागवणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 
 
कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी करत अण्णाद्रमुकच्या (AIADMK) खासदारांनी आज राज्यसभेत गोंधळ घालत राज्यसभेचं कामकाज बंद पाडलं. तर भाजपा जाणूनबुजून हे सर्व करायला लावत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कार्ती चिदंबरम यांनी मात्र आपण सर्व व्यवहार नियमांत केले असल्यांच स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Web Title: Kuber's treasure was discovered by Karti Chidambaram in the ED's raids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.