कुडानकुलम ठरला 1क्क्क् मेगाव्ॉट वीजनिर्मितीचा पहिला अणुऊर्जा प्रकल्प
By admin | Published: June 8, 2014 12:24 AM2014-06-08T00:24:46+5:302014-06-08T00:24:46+5:30
कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाने शनिवारी आपली पूर्ण वीज उत्पादन क्षमता गाठून 1क्क्क् मेगाव्ॉट वीजनिर्मिती करणारा देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प म्हणून आपले नाव नोंदविले.
Next
>चेन्नई : कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाने शनिवारी आपली पूर्ण वीज उत्पादन क्षमता गाठून 1क्क्क् मेगाव्ॉट वीजनिर्मिती करणारा देशातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प म्हणून आपले नाव नोंदविले. प्रकल्पाचे साईट डायरेक्टर आर. एस. सुंदर यांनी ही माहिती दिली.
‘शनिवारी दुपारी 1.2क् वाजता कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या संच 1 ने आपल्या 1क्क्क् मेगाव्ॉट या पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यास प्रारंभ केला. अणुऊर्जा नियामक मंडळाने बंधनकारक केलेल्या काही चाचण्या घेण्यासाठी आम्ही हा संच 1 बंद करू. परंतु त्यापूर्वी हा संच आपल्या पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन घेत राहील,’ असे सुंदर यांनी सांगितले.
देशातील इतर ऊर्जा प्रकल्पांच्या मानाने कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्प केवळ एका संचामधून मोठय़ा प्रमाणात वीजनिर्मिती करण्यास सक्षम आहे. अन्य प्रकल्प केवळ 54क् मेगाव्ॉटर्पयत ऊर्जानिर्मितीची क्षमता बाळगतात.
औष्णिक प्रकल्प 66क् ते 68क् मेगाव्ॉटर्पयत ऊर्जानिर्मिती करू शकतात. दुसरा 7क्क् मेगाव्ॉट ऊर्जानिर्मिती करणारा प्रकल्प सध्या तयार केला जात आहे. त्यामुळे कुडानकुलम अणुऊर्जा प्रकल्प हा 1क्क्क् मेगाव्ॉट ऊर्जानिर्मिती करणारा देशातील पहिला प्रकल्प ठरला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
4हा देशातील 21 वा व अणुऊर्जा रिअॅक्टर आणि लाईट वॉटर रिअॅक्टर श्रेणीतील भारताचा पहिलाच प्रेशराईज वॉटर रिअॅक्टर ठरला आहे. रशियाच्या सहकार्याने हा प्रकल्प तामिळनाडूच्या कुडानकुलम येथे उभारण्यात आला होता.