कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा धोका नाही, पाकिस्तानची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2017 09:09 AM2017-12-22T09:09:05+5:302017-12-22T09:10:20+5:30

हेरगिरीच्या आरोपात दोषी मानून पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा धोका नाही.

Kulbhushan Jadhav is not at risk of immediate hanging, Pakistan's information | कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा धोका नाही, पाकिस्तानची माहिती

कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा धोका नाही, पाकिस्तानची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्दे हेरगिरीच्या आरोपात दोषी मानून पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा धोका नाही. आई आणि पत्नीला दिलेली भेटीची संधी ही शेवटची संधी ठरणार नाही, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी दिली आहे.

इस्लामाबाद- हेरगिरीच्या आरोपात दोषी मानून पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा धोका नाही. त्यामुळे आई आणि पत्नीला दिलेली भेटीची संधी ही शेवटची संधी ठरणार नाही, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी दिली आहे. गुरूवारी या संदर्भातील माहिती समोर आली आहे. कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी सोमवारी म्हणजेच 25 डिसेंबर रोजी कुलभूषण जाधव यांना भेटायला पाकिस्तानात जाणार आहेत. 

कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला त्यांच्या भेटीसाठी दिलेली परवानगी ही पूर्णपणे मानवतेच्या दृष्टीने देण्यात आली असून कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा कुठलाच धोका नाही, असं गुरूवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत डॉ.मोहम्मद  फैसल यांनी म्हंटलं आहे.  कुलभूषण जाधव यांची दया याचिका अजूनही प्रलंबित असल्यानं ही बाब स्पष्ट होते, असंही ते म्हणाले. कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट झाल्यावर त्यांना तात्काळ फाशी देण्यात येईल का ? यांसारख्या प्रश्नावर मोहम्मद फैसल यांनी उत्तरं दिली आहेत. 

कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला भेटीसाठी देण्यात आलेली संधी ही इस्लामी परंपरेनुसार पूर्णपणे मानवतेचा विचार करुन देण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने या दोघींनाही व्हिसा मंजूर केला आहे. त्यांची जाधव यांच्याशी सोमवारी पाकिस्तानातील विदेश मंत्रालयात भेट होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय उच्चायुक्तांमधील एका प्रतिनिधीलाही जाण्याची परवानगी देण्यात येईल, असंही डॉ. फैसल यांनी म्हंटलं. पाकिस्तानकडून जाधव यांच्या आई आणि पत्नीला माध्यमांशी बोलण्याचीही परवानगी दिली जाणार आहे. या संदर्भात आम्ही भारताच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं फैसल यांनी सांगितलं. 
 

Web Title: Kulbhushan Jadhav is not at risk of immediate hanging, Pakistan's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.