Live : पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत कुलभूषण जाधव यांची आई-पत्नीसोबत झाली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 09:30 AM2017-12-25T09:30:02+5:302017-12-25T15:19:25+5:30
हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक व भारतीय नौदलातील निवृत्ती अधिकारी कुलभूषण जाधव दीड वर्षांनंतर कुटुंबीयांना भेटले.
नवी दिल्ली - हेरगिरी केल्याच्या आरोपावरुन पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक व भारतीय नौदलातील निवृत्ती अधिकारी कुलभूषण जाधव आज दीड वर्षांनंतर कुटुंबीयांना भेटले आहेत. पाकिस्तानातील कोर्टानं कुलभूषण जाधव यांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण जाधव यांची आई अवंतिका जाधव आणि पत्नीसोबत इस्लामाबाद येथील पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात भेट झाली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पाकिस्ताननं सुरक्षा व्यवस्थेत शार्प शूटर, पाकिस्तानीर रेंजर्स आणि निमलष्करी दलदेखील तैनात केले होते. दरम्यान, जाधव कुटुंबीयांसोबत भारताचे उप-उच्चायुक्त जे.पी.सिंह आणि पाकिस्तानी महिला अधिकारीदेखील होत्या.
ज्या मार्गावर परराष्ट्र मंत्रालयाचे कार्यालय स्थित आहे तेथे सर्वसामान्य नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाबाहेर मीडिया कर्मचा-यांचीही प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. जाधव कुटुंबीय पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालय परिसरात दाखल झाल्यानंतर त्यांनी मीडियाला अभिवादनदेखील केले, मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकर दिला.
जाधव कुटुंबीय दुबईमार्गे इस्लामाबाद येथे दाखल झाले. या भेटीचे फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध करणार असल्याचे पाकिस्ताननं सांगितले होते. याव्यतिरिक्त जर भारतानं परवानगी दिली तर त्यांच्या कुटुंबीयांना मीडियासोबत बातचित करण्याचीही परवानगी देण्यात येईल. दरम्यान, यानंतर जाधव यांचे कुटुंबीय मीडियासोबत बातचित करणार नसल्याचे पाकिस्तानी अधिका-यांनी सांगितले.
Wife & mother of #KulbhushanJadhav meet him at Pakistan Foreign Affairs Ministry in Islamabad: Pak media pic.twitter.com/QqPyiSIK2O
— ANI (@ANI) December 25, 2017
Islamabad: Wife & mother of #KulbhushanJadhav at Pakistan Foreign Affairs Ministry. pic.twitter.com/8YrqNABhrM
— ANI (@ANI) December 25, 2017
#WATCH: Wife, mother of Kulbhushan Jadhav reach Pakistan Foreign Affairs Ministry in Islamabad along with JP Singh, Deputy High Commissioner pic.twitter.com/Dnp9eUc5je
— ANI (@ANI) December 25, 2017
Islamabad: Wife & mother of #KulbhushanJadhav at Pakistan Foreign Affairs Ministry. pic.twitter.com/8YrqNABhrM
— ANI (@ANI) December 25, 2017
Wife, mother of Kulbhushan Jadhav reached Pakistan Foreign Affairs Ministry in Islamabad along with JP Singh, Deputy High Commissioner pic.twitter.com/8j4os0h64T
— ANI (@ANI) December 25, 2017
Islamabad: Wife, mother of Kulbhushan Jadhav reach Pakistan foreign affairs Ministry along with JP Singh, Deputy High Commissioner pic.twitter.com/6HFaQjAW4z
— ANI (@ANI) December 25, 2017
Indian national #KulbhushanJadhav's wife and mother to first visit the Indian High Commission in Islamabad. The meeting is expected to take place at 1pm (Pak time): Pak media
— ANI (@ANI) December 25, 2017
Shots of Pakistan Ministry of Foreign Affairs premises in Islamabad; Indian national #KulbhushanJadhav's wife and mother to arrive here shortly to meet him pic.twitter.com/nxlfhWsazz
— ANI (@ANI) December 25, 2017
Visuals from outside Pakistan Ministry of Foreign Affairs in Islamabad; Indian national #KulbhushanJadhav's wife and mother to arrive here shortly to meet him pic.twitter.com/v53mwE87wt
— ANI (@ANI) December 25, 2017
Media persons and OB vans outside Pakistan Ministry of Foreign Affairs in #Islamabad; Indian national #KulbhushanJadhav's wife and mother to arrive here shortly to meet him pic.twitter.com/f625WwhGvj
— ANI (@ANI) December 25, 2017
Indian national #KulbhushanJadhav has not been given consular access, reports Pak media quoting Foreign Office pic.twitter.com/oOaOKPZlLp
— ANI (@ANI) December 25, 2017
Pakistan Rangers, Anti-Terrorism squads and sharp shooters at roof tops deployed; other than media and security personnel, no other traffic allowed in the area around Pakistan Ministry of Foreign Affairs in #Islamabad: Pak media #KulbhushanJadhav
— ANI (@ANI) December 25, 2017
#SpotVisuals Indian national Kulbhushan Jadhav's wife and mother will meet him at the Pakistan Ministry of Foreign Affairs in Islamabad shortly pic.twitter.com/936rkIKTON
— ANI (@ANI) December 25, 2017
Indian national #KulbhushanJadhav's wife and mother reach Pakistan's Islamabad
— ANI (@ANI) December 25, 2017
Indian Deputy High Commissioner in Pakistan J.P Singh, to accompany Kulbhushan Jhadav's wife and mother in their meeting with the Indian national, reports Pakistan media.
— ANI (@ANI) December 25, 2017
#ExpectToday Indian national Kulbhushan Jadhav's wife and mother will reach Islamabad to meet him, today pic.twitter.com/bIN9C4Yvkj
— ANI (@ANI) December 25, 2017
पाकिस्तानकडून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न
मात्र, सकाळपासूनच या भेटीबाबत गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वीच पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्ताकडून भारताला कुलभूषण जाधव यांचा कॉन्स्युलर अॅक्सेस देण्यात आल्याचे सांगितले. मात्र, भारताकडून हे वृत्त फेटाळण्यात आले होते. त्यामुळे कुलभूषण जाधव यांच्या कॉन्स्युलर अॅक्सेसवरून अजूनही संभ्रम आहे. कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीसोबतची भेट साधारण 12.30 वाजता होईल. त्यांना भेटण्यासाठी केवळ 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला आहे. मात्र, तुरुंगातील नियमांचा दाखला देत पाकिस्तानने या भेटीत आडकाठी घातली आहे. त्यामुळे ही भेट आणखी काही काळ लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ख्वाजा आसिफ यांनी जिओ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, कुलभूषण जाधव आज त्यांच्या आई व पत्नीला भेटतील. त्यावेळी भारतीय अधिकारीही उपस्थित राहू शकतील. परंतु, आमच्या जागी भारत असता तर त्यांनी आम्हाला कॉन्स्युलर अॅक्सेस दिला असता का, असा खोचक प्रश्नही ख्वाजा आसिफ यांनी विचारला.
Pakistan has given New Delhi consular access to Indian national #KulbhushanJadhav says Pakistan foreign minister Khawaja Asif to Geo news in an interview (file pic) pic.twitter.com/BCYitZDtgs
— ANI (@ANI) December 25, 2017
20 डिसेंबर रोजी कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला पाकिस्तानने व्हिसा जारी केला होता. त्यामुळे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी जाण्याचा कुटुंबीयांचा मार्ग मोकळा झाला. हेरगिरी व दहशतवादाच्या आरोपावरून जाधव यांना पाकच्या लष्करी न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताच्या अपिलावरून मे महिन्यात शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळे जगभरात पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती.
तात्काळ फाशीचा धोका नाही, पाकिस्तानची माहिती
आई आणि पत्नीला दिलेली भेटीची संधी ही शेवटची संधी ठरणार नाही, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल यांनी दिली आहे. गुरूवारी या संदर्भातील माहिती समोर आली. कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला त्यांच्या भेटीसाठी दिलेली परवानगी ही पूर्णपणे मानवतेच्या दृष्टीने देण्यात आली असून कुलभूषण जाधव यांना तात्काळ फाशीचा कुठलाच धोका नाही, असं गुरूवारी झालेल्या साप्ताहिक बैठकीत डॉ.मोहम्मद फैसल यांनी म्हटलं. कुलभूषण जाधव यांची दया याचिका अजूनही प्रलंबित असल्यानं ही बाब स्पष्ट होते, असंही ते म्हणाले. कुलभूषण जाधव यांची त्यांच्या कुटुंबीयांशी भेट झाल्यावर त्यांना तात्काळ फाशी देण्यात येईल का ? यांसारख्या प्रश्नावर मोहम्मद फैसल यांनी उत्तरं दिली आहेत.
कुलभूषण जाधव यांच्या आईला आणि पत्नीला भेटीसाठी देण्यात आलेली संधी ही इस्लामी परंपरेनुसार पूर्णपणे मानवतेचा विचार करुन देण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने या दोघींनाही व्हिसा मंजूर केला आहे. त्यांची जाधव यांच्याशी पाकिस्तानातील परराष्ट्र मंत्रालयात भेट होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय उच्चायुक्तांमधील एका प्रतिनिधीलाही जाण्याची परवानगी देण्यात येईल, असंही डॉ. फैसल यांनी म्हंटलं. पाकिस्तानकडून जाधव यांच्या आई आणि पत्नीला माध्यमांशी बोलण्याचीही परवानगी दिली जाणार आहे. या संदर्भात आम्ही भारताच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं फैसल यांनी सांगितलं.