म्हणे, कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास दिला नकार; पाकचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 02:51 PM2020-07-08T14:51:55+5:302020-07-08T14:54:02+5:30

पाकिस्तानी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जाधव यांना १७ जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते, पण जाधव यांनी नकार दिला.

Kulbhushan Jadhav refuses to file an review petition, Pakistan's claim | म्हणे, कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास दिला नकार; पाकचा दावा

म्हणे, कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास दिला नकार; पाकचा दावा

Next
ठळक मुद्देपाकिस्तानने दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची ऑफर दिली आहे.जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचे माहिती मिळत आहे.कुलभूषण जाधव हे २०१६ पासून पाकिस्तानच्या तुरूंगात आहेत. कुलभूषण जाधव हे हेर असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे.

पाकिस्तानच्या तुरुंगात हेरगिरीच्या आरोपाखाली कैद असलेले भारतीय नागरिक आणि माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबद्दल पाकिस्तान सरकारने आता  दावा केला आहे. कुलभूषण जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिला, असा दावा पाक सरकारने केला आहे. तसेच जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची ऑफर देण्यात आल्याचा देखील पाकिस्तानचा दावा आहे. जाधव यांनी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास नकार दिल्याचे माहिती मिळत आहे.

पाकिस्तानी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने जाधव यांना १७ जून रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास सांगितले होते, पण जाधव यांनी नकार दिला. यासंदर्भात पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तांना पत्र लिहिले आहे. पाकिस्तानने दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याची ऑफर दिली आहे.

कुलभूषण जाधव हे २०१६ पासून पाकिस्तानच्या तुरूंगात आहेत. कुलभूषण जाधव हे हेर असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. पण हा दावा भारतानं बर्‍याच वेळा नाकारला आहे. हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सुरक्षा दलांनी ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून कुलभूषण यांना अटक केली. सन २०१७ मध्ये भारतानं आयसीजेकडे हे प्रकरण सोपावलं. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोर्टाने पाकिस्तानला कुलभूषण जाधव यांना कॉन्सुलर अ‍ॅक्सेस देण्याची आणि फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करण्यास सांगितले होते.


गेल्या वर्षी भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावरुन दबाव आणल्यामुळे पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र त्यावेळी पाकिस्ताननं जाधव यांच्या आई आणि पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली होती. कुलभूषण जाधव यांना भेटण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र काढायला सांगितलं होतं. यानंतर काही दिवसांनी पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला गेला. यामध्ये कुलभूषण स्वत:ला हेर म्हणत होते. मात्र, हा व्हिडीओ पाकिस्तानच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप झाला होता.  

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

विकास दुबेची नेपाळ सीमेवर शोधाशोध; प्रत्येक भिंतीवर 'मोस्ट वॉन्टेड'चे पोस्टर

Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल 

 

विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस 

पाकिस्तानी अधिकाऱ्यांना संवेदनशील माहिती देत होता हा निलंबित पोलीस अधिकारी, NIA च्या चौकशीत खुलासा 

 

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर तणावात असलेल्या महिलेने सुशांतच्या आत्महत्येनंतर संपवले आयुष्य

Read in English

Web Title: Kulbhushan Jadhav refuses to file an review petition, Pakistan's claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.