कुलभूषण जाधव सुरक्षित - पाक

By admin | Published: May 30, 2017 08:15 PM2017-05-30T20:15:29+5:302017-05-30T20:36:14+5:30

पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव सुरक्षित असल्याची कबुली पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दिली आहे.

Kulbhushan Jadhav safe - Pak | कुलभूषण जाधव सुरक्षित - पाक

कुलभूषण जाधव सुरक्षित - पाक

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव सुरक्षित असल्याची कबुली पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी दिली आहे. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भारत पाकिस्तानसंबंधीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. भारतीय लष्कराने 9 मे रोजी नौसेरामध्ये केलेल्या कारवाईचा व्हिडिओ खोटा असल्याचा दावाही यावेळी बासित यांनी केला.
पाकिस्तानच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीम म्हणजे BAT ने भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली नाही, असे स्पष्टीकरण यावेळी बासित यांनी दिले. भारताकडे यासंबंधित काही पुरावा असेल, तर तो पाकिस्तानला द्यावा, असं आव्हानही यावेळी त्यांनी केला.
सुरक्षेसंबंधीत मुद्द्यांवर राजनैतिक मदत केवळ मेरिटच्या आधारावरच दिली जाईल, असं भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जो सामंजस्य करार आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे, असं उत्तर बासित यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात झालेल्या सुनावणीवर विचारलेल्या प्रश्नाला दिलं.
काश्मीर ही एक समस्या असून ती सोडवणं अत्यंत गरजेचं आहे. काश्मीरप्रश्न सुटला नाही तर उभय देशांचे संबंधही सुधारणार नाहीत. पाकिस्तान काश्मीरींना भारताविरुद्ध भडकावत नाही, असेही ते म्हणाले. शिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी बुरहान वानीला हिरो म्हणून काहीही चूक केलेली नाही, असंही बासित म्हणाले.

Web Title: Kulbhushan Jadhav safe - Pak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.