7 वर्षीय चिमुकल्याच्या उपचारासाठी 50 लाखांची गरज; लेकासाठी बापाची धडपड, मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 02:25 PM2023-03-26T14:25:26+5:302023-03-26T14:32:26+5:30

आयुष्मान शर्मा हा ब्लड कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे.

kullu 7 year boy suffering with blood cancer 50 lakhs rupees need for treatment | 7 वर्षीय चिमुकल्याच्या उपचारासाठी 50 लाखांची गरज; लेकासाठी बापाची धडपड, मागितली मदत

फोटो - news18 hindi

googlenewsNext

सात वर्षांचा निरागस आयुष्मान शर्मा हा ब्लड कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. आयुष्मानचे वडील प्रमोद शर्मा हे कुल्लू जिल्ह्याचे रहिवासी आहेत आणि आपल्या मुलाची जीव वाचवण्यासाठी ते शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत, परंतु आर्थिक समस्या आणि बेरोजगारीमुळे त्यांचे त्यांचा नाईलाज झाला आहे. आयुष्मानचे वडील प्रमोद शर्मा यांनी मंडीतील मीडिया कर्मचार्‍यांना संबोधित केले आणि मीडियाद्वारे मुलाच्या उपचारासाठी मदत मागितली.

प्रमोद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष्मान शर्माच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट, केमोथेरपी आणि इम्युनोथेरपीसाठी सुमारे 50 लाख खर्च येणार आहेत. सध्या पीजीआय चंदीगडमध्ये दाखल असलेल्या या मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी मुख्यमंत्री कार्यालय शिमला आणि सीपीएस सुंदर सिंह ठाकूर यांच्याकडे फाइल्स सुपूर्द केल्या आहेत. प्रमोद शर्मा यांनी सांगितले की, आयुष्मानची आतापर्यंत केमोथेरपी झाली आहे. याशिवाय 1 लाख 19 हजार रुपयांचे इंजेक्शनही दिले जात आहे. 

मुलाला एकूण 15 इंजेक्शन्स दिली जाणार असून, त्यानंतर त्याच्या बोन मॅरोचे प्रत्यारोपण केले जाणार आहे. डॉक्टरांच्या मते या संपूर्ण उपचारासाठी 50 लाखांची गरज भासणार आहे.प्रमोद शर्मा यांनी दानशूर व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्था आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांना या कठीण काळात मदत करून आपल्या मुलाचा जीव वाचवावा, असे आवाहन केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: kullu 7 year boy suffering with blood cancer 50 lakhs rupees need for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.