Kumar Vishwas : कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलिसांचे पथक, फोटो शेअर करत भगवंत मान यांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 10:04 AM2022-04-20T10:04:17+5:302022-04-20T10:04:26+5:30

Kumar Vishwas: कवी कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते, त्यामुळेच पोलिसांचे पथक त्यांच्या घरी दाखल झाल्याचे बोलले जात आहे.

Kumar Vishwas | Bhagwant Mann | Arvind Kerjiwal | AAP | Punjab police reaches Kumar Vishwas home, he warns CM Bhagwant Mann and Arvind Kerjiwal | Kumar Vishwas : कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलिसांचे पथक, फोटो शेअर करत भगवंत मान यांना दिला इशारा

Kumar Vishwas : कुमार विश्वास यांच्या घरी पंजाब पोलिसांचे पथक, फोटो शेअर करत भगवंत मान यांना दिला इशारा

Next

नवी दिल्ली: आज सकाळी अचानक पंजाब पोलिसांचे (Punjab Police) पथक आम आदमी पक्षाचे (AAP) माजी नेते कुमार विश्वास(Kumar Vishwas ) यांच्या घरी दाखल झाले. कुमार विश्वास यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यासंदर्भात त्यांनी काही छायाचित्रे ट्विट केली आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी आपचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kerjiwal) यांच्यावर निशाणा साधत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann)  यांना इशारा दिला आहे. 

कुमार विश्वास यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "आज पहाटे अचानक पंजाब पोलीस दारात आले. एकेकाळी माझ्या हस्ते पक्षात सामील झालेल्या भगवंत मान यांना इशारा देतो की, दिल्लीत बसलेल्या व्यक्तीला (अरविंद केजरीवाल) तुम्ही पंजाबच्या जनतेने दिलेल्या सत्तेशी खेळू देत आहात. तो एक दिवस तुमचा आणि पंजाबचा विश्वासघात करेल, देशाने माझा इशारा लक्षात ठेवावा.''

कुमार विश्वास यांचे केजरीवालांवर गंभीर आरोप
कुमार विश्वास यांनी ट्विटरवर त्यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांची छायाचित्रे ट्विट केली आहेत. कुमार विश्वास यांच्या घरात पोलीस का आले आहेत, याचे कारण अद्याप समोर आले नाही. पण, पंजाबमधील निवडणुकीदरम्यान कुमार विश्वास यांनी आपप्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. केजरीवाल यांचा कट्टरतावाद्यांशी संबंध असून, त्यांनी देश तोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विश्वास यांनी केला होता. याबाबत त्यांनी केजरीवाल यांच्याकडे उत्तरही मागितले होते. 

Web Title: Kumar Vishwas | Bhagwant Mann | Arvind Kerjiwal | AAP | Punjab police reaches Kumar Vishwas home, he warns CM Bhagwant Mann and Arvind Kerjiwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.