Kumar Vishwas Ghee Tweet: ‘एक कोटी रुपये = एक किलो तूप’, कुमार विश्वास यांचा रोख केजरीवालांकडे ? जाणून घ्या प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 05:18 PM2023-04-30T17:18:32+5:302023-04-30T17:23:28+5:30
Kumar Vishwas On Social Media: प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांच्या एका ट्विटमुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे.
Poet Kumar Vishwas Tweet: प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास हे त्यांच्या हजरजवाबीपणासाठी ओळके जातात. सोशल मीडियावरही ते खूप सक्रिय असतात आणि अनेक मुद्द्यांवर आपले मत व्यक्त करत राहतात. कधीकाळी त्यांनी आम आदमी पार्टीतून राजकारणातही प्रवेश केला होता, पण दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यानंतर अनेकदांनी त्यांनी इशाऱ्यातून केजरीवालांवर टीका केली आहे.
दरम्यान, अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एका व्यक्तीने तूपाचा फोटो शेअर करत ट्विट केले आणि विचारले की, तुमच्या शहरात तुपाची किंमत काय आहे? या ट्विटवर अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात कुमार विश्वास यांनीही याच ट्विटला उत्तर दिले. “दिल्लीचे दक्षिणपर्यंत विकले जात आहे. एक कोटी = एक किलो तूप.'' आता विश्वास यांच्या या उत्तरावर अनेक प्रतिक्रिया आल्या आणि लोकांनी त्याचा अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंध जोडला.
दिल्ली का तो साउथ तक बिक रहा है 😎
— Dr Kumar Vishvas (@DrKumarVishwas) April 30, 2023
एक करोड़ रुपये = एक किलो घी 😁 https://t.co/dCt6Ur6y30
केजरीवालांशी संबंध कसा आला?
यामागे एक रिपोर्ट आहे, ज्यामध्ये दिल्लीच्या मंडोली तुरुंगात बंद असलेला गँगस्टर सुकेश चंद्रेशेखर याने काही दिवसांपूर्वी अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप केला होता. तो म्हणाला होता की, दिल्ली सरकार आणि दक्षिणेतील मद्य लॉबी यांच्यात हातमिळवणी झाली आहे. हा सौदा करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी टीआरएस कार्यालयात 15 कोटी रुपये पोहोचवण्यास सांगितले होते. त्यासाठी 15 किलो तूप असा सांकेतिक शब्द वापरला गेला होता. आता कुमार विश्वास यांच्या ट्विटला लोकांनी केजरीवाल यांच्या प्रकरणाशी जोडले आहे.