कुमारस्वामींचा शपथविधी सात मिनिटांचा; खर्च 42 लाखांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 03:22 PM2018-08-09T15:22:46+5:302018-08-09T15:24:53+5:30
आम आदमीच्या केजरीवालांचे एका दिवसाचे बिल 1.85 लाख
बेंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्या शपथग्रहन सोहळ्याचा एका दिवसाचा खर्च पाहून तुमच्या पायाखालची जमीनच घसरून जाईल. या सात मिनिटांच्या शपथविधी समारंभाला तब्बल 42 लाख रुपये खर्च करण्यात आले. तर आम आदमी पाटीचे बिरुद मिरवणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका रात्रीत दोन लाखांचे बिल केले आहे. हे सर्व माहिती अधिकारात समोर आले आहे.
कुमारस्वामी यांचा शपथविधी कार्यक्रम सात मिनिटांचा होता. यासाठी देशभरातून विविध राज्यांचे मुख्यमंत्री व पाहुणे असे 42 जण उपस्थित राहिले होते. यामध्ये केजरीवाल,चंद्राबाबू नायडू यांचाही समावेश होता. केजरीवाल हे ताज वेस्ट एंड हॉटेलमध्ये 23 मे रोजी थांबले होते. त्यांनी 23 ला सकाळी 9.49 मिनिटांनी चेक इन केले व 24 तारखेला पहाटे 5.35 वाजता निघाले. या काळाचे बिल डायनिंग रुम व जेवणाचा खर्च पकडून 71 हजार रुपये आला. तर पेयांचा खर्च 5000 रुपये करण्यात आला.
यापूर्वी 2013 मध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि 17 मे, 2018 भाजपचे मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांच्या शपथविधीला कर्नाटक सरकारने खर्च केला नव्हता. यामुळे विरोधी पक्षांनी हे पैसे जेडीएसच्या खात्यातून कापून घेण्याची मागणी केली आहे.
चंद्राबाबूंवर खर्च सर्वाधिक
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यावर जवळपास 9 लाख रुपये खर्च करण्यात आले.