Kumbh Mela: कुंभमेळ्यात ११ भाविकांचा ह्रदयविकाराने मृत्यू, अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 19:04 IST2025-01-14T19:03:13+5:302025-01-14T19:04:44+5:30
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात ११ भाविकांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची पोस्ट एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Kumbh Mela: कुंभमेळ्यात ११ भाविकांचा ह्रदयविकाराने मृत्यू, अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा
Kumbh Mela 2025 updates: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा सुरू आहे. या मेळ्यात ११ भाविकांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला असल्याची एक फेक न्यूज सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुंभमेळ्यात ११ भाविकांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. एका व्यक्तीने फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली होती. हा प्रकार सोमवारी समोर आला.
सोशल मीडियावर चर्चा
अवकुश कुमार सिंह यांनी सोशल मीडिया या फेक न्यूज संदर्भात पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी एक्सवरही पोस्ट करून याबद्दल माहिती दिली.
तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, आरोपी लालू यादव संजीवने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमध्ये असे म्हटले होते की, कुंभमेळ्यात स्नान करताना ११ भाविकांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला आहे. अतिदक्षता विभाग रुग्णांनी भरले आहेत.
पोलिसांनी दाखल केला गुन्हा
याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ही पोस्ट पूर्ण खोटी आणि दिशाभूल करणारी आहे. या पोस्टने सर्वसामान्य माणसांमध्ये भीती आणि अशांतता निर्माण करण्याचे काम केले आहे. या प्रकरणी पखडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी राजेंद्र प्रसाद सिंह यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता कलम ३५३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक मोहम्मद फहीम कुरैशी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.