हर्षा रिछारिया सोडा..., कुंभमेळ्यात व्हायरल होतेय आणखी एक 'सुंदरी'; काय काम करते? जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 11:42 IST2025-01-17T11:41:45+5:302025-01-17T11:42:59+5:30

Kumbh mela 2025 : कुंभमेळ्यात भाविकांची मोठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. यात काही लोक असेही आहेत, ज्यांना पाहून संपूर्ण देश थक्क आहे...

Kumbh mela 2025 After Harsha Richaria another beautiful girl goes viral at Kumbh Mela, you will be surprised to know her work | हर्षा रिछारिया सोडा..., कुंभमेळ्यात व्हायरल होतेय आणखी एक 'सुंदरी'; काय काम करते? जाणून थक्क व्हाल!

हर्षा रिछारिया सोडा..., कुंभमेळ्यात व्हायरल होतेय आणखी एक 'सुंदरी'; काय काम करते? जाणून थक्क व्हाल!

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी रोजी कुंभमेळ्याला उत्साहात सुरुवता झाली. आज महाकुंभचा चौथा दिवस आहे. येथे मोठ्या प्रमाणारव भाविकांची गर्दीही दिसून येत आहे. यात काही लोक असेही आहेत, ज्यांना पाहून संपूर्ण देश थक्क आहे. याचे एक उदाहरण म्हणजे, आयआयटीयन बाबा. ज्यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडून आध्यात्माचा मार्ग स्वीकारला आहे.

याशिवाय, कुंभमेळ्यात साध्वीच्या पोषाखातील हर्षा रिछारियादेखील जबरदस्त व्हायरल होत आहे. यातच आता, या कुंबमेळ्यातील आणखी एक सुंदरी व्हायरल होत आहे. ही मुलगी काय काम करते, हे जाणून आपणही थक्क व्हाल.

हर्षा रिछारियानंतर व्हायरल होतेय ही मुलगी - 
हर्षा रिछारिया चर्चेत असतानाच आणखी एक सुंदरी कुंभमेळ्यात व्हायरल होत आहे. ही मुलगी साध्वी नाही. पण, तरीही आपल्या सौंदर्याने सर्वांना आकर्षित केले आहे. लोक तिच्या जवळ येऊन सेल्फी काढत आहेत. एवढेच नाही तर, अनेक लोक या मुलीची तुलना मोनालिसासोबत करू लागले आहे. ही मुलगी सोशल मीडियावर जबरदस्तत व्हायरल होत आहे.

करते फुलं विकण्याचं काम -
व्हायरल होत असलेली ही मुलगी काय काम करते? हे जाणून आपणही थक्क व्हाल. तर, महाकुंभमेळ्यात व्हायरल होत असलेली ही मुलगी भाविक नसून फुलं विकण्याचे काम करते. या मुलीचे डोळे एखाद्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नाहीत. महत्वाचे म्हणजे, कुंभमेळ्यात आलेले लोकही या मुलीसोबत सेल्फी घेत आहेत. सोशल मीडियावर हर्षा रिछारियानंतर ही मुलगीही जबरदस्त व्हायरल होत आहे. 
 

Web Title: Kumbh mela 2025 After Harsha Richaria another beautiful girl goes viral at Kumbh Mela, you will be surprised to know her work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.