कुंभमेळ्यात महा‘अर्थ’, जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून २ लाख कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 07:02 IST2025-01-15T07:02:47+5:302025-01-15T07:02:59+5:30

Kumbh Mela 2025 : देश-विदेशातून या महाकुंभाच्या निमित्ताने पवित्र स्नानासाठी भाविक येणार आहेत.

Kumbh Mela 2025 : Kumbh Mela brings in a huge 'money', turnover of 2 lakh crores from the world's largest religious event | कुंभमेळ्यात महा‘अर्थ’, जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून २ लाख कोटींची उलाढाल

कुंभमेळ्यात महा‘अर्थ’, जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमातून २ लाख कोटींची उलाढाल

Kumbh Mela 2025 : नवी दिल्ली : सोमवार १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ फेब्रुवारीपर्यंत चालणार असून जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सुमारे ४० कोटी भाविक सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कैट) राष्ट्रीय महासचिव आणि खासदार प्रवीण खंडेलवाल यांच्या मते या महाकुंभात २ लाख कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल होणार आहे. यामुळे देशाच्या अर्थकारणालाही गती मिळेल. 

देश-विदेशातून या महाकुंभाच्या निमित्ताने पवित्र स्नानासाठी भाविक येणार आहेत. प्रवीण खंडेलवाल यांच्या मते, या सोहळ्यामुळे प्रयागराज आणि आसपासच्या भागातील व्यापार, रेल्वे, हवाई सेवा आणि रस्ते वाहतुकीला गती मिळणार आहे. दिल्लीहून प्रयागराज आणि आसपासच्या भागांमध्ये सुमारे ४० हजार कोटींच्या माल आणि सेवांचा पुरवठा होईल. महाकुंभ २०२५ हा केवळ श्रद्धा आणि अध्यात्माचा केंद्रबिंदू नाही, तर भारताच्या सांस्कृतिक आणि आर्थिक ताकदीचे प्रतीक आहे. 

एक भाविक सरासरी किती खर्च करणार?
एका अंदाजानुसार, महाकुंभात एका व्यक्तीकडून सरासरी ५ हजार खर्च केले जाऊ शकतात. प्रामुख्याने हॉटेल, धर्मशाळा, तात्पुरता निवास, भोजन, पूजेची साहित्ये, आरोग्य सेवा आणि इतर वस्तू व सेवांचा असेल. त्यामुळेच एकूण सोहळ्याची उलाढाल २ लाख कोटींच्या घरात जाऊ शकते. 

जागतिक स्तरावर ओळख
महाकुंभमुळे उत्तर प्रदेशासह देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. मोठे आयोजन स्थानिक व्यापार, रोजगार आणि पर्यटनाला नव्या उंचीवर नेऊन ठेवते. संपूर्ण देशाच्या आर्थिक प्रगतीत महत्त्वाचे योगदान देईल. या आयोजनामुळे भारताची धार्मिक अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर झळकणार असून, उत्तर प्रदेशला धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख मिळेल.

कोणत्या सेवांमधून किती रुपयांची उलाढाल?
निवास, धर्मशाळा     ४०,००० कोटी
खाद्यपदार्थ, बिस्किटे     २०,००० कोटी
पूजा साहित्य, प्रसाद    २०,००० कोटी 
मालवाहतूक, टॅक्सीसेवा     १०,००० कोटी
ट्रॅव्हल , पर्यटन सेवा     १०,००० कोटी
जाहिरात, प्रचार उपक्रम    १०,००० कोटी
हस्तकला, कपडे, दागिने    ५,००० कोटी
आरोग्यसेवा, औषधे    ३,००० कोटी
आयटी, वाय-फाय सेवा    १,००० कोटी

Web Title: Kumbh Mela 2025 : Kumbh Mela brings in a huge 'money', turnover of 2 lakh crores from the world's largest religious event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.