‘पद्मावती’च्या वादावरून कुंभलगडची दारेही बंद, राजपूत समुदायाची ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 02:27 AM2017-11-19T02:27:22+5:302017-11-19T02:27:30+5:30

पद्मावती चित्रपटावर पूर्ण बंदी आणावी या मागणीसाठी राजपूत समुदायाच्या शेकडो आंदोलकांनी शनिवारी राजसमंद जिल्ह्यात कुंभलगड किल्ल्यात प्रवेशबंदी केली. राजस्थानच्या चित्तोडगढमध्ये स्थानिकांनी येथील किल्लाच पर्यटकांसाठी शुक्रवारी बंद केल्यानंतरच आजचे हे दुसरे आंदोलन आहे.

Kumbhalgad's doors closed on the promise of 'Padmavati', Rajput community's demonstrations | ‘पद्मावती’च्या वादावरून कुंभलगडची दारेही बंद, राजपूत समुदायाची ठिकठिकाणी निदर्शने

‘पद्मावती’च्या वादावरून कुंभलगडची दारेही बंद, राजपूत समुदायाची ठिकठिकाणी निदर्शने

googlenewsNext

जयपूर : पद्मावती चित्रपटावर पूर्ण बंदी आणावी या मागणीसाठी राजपूत समुदायाच्या शेकडो आंदोलकांनी शनिवारी राजसमंद जिल्ह्यात कुंभलगड किल्ल्यात प्रवेशबंदी केली. राजस्थानच्या चित्तोडगढमध्ये स्थानिकांनी येथील किल्लाच पर्यटकांसाठी शुक्रवारी बंद केल्यानंतरच आजचे हे दुसरे आंदोलन आहे.
चित्तोडगढचे पोलीस अधिकारी ओमप्रकाश यांनी सांगितले की, चित्तोडगढमध्ये परिस्थिती सामान्य आहे. कुंभलगड येथील किल्ल्यात प्रवेशबंदी केली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कुंभलगड हे राजा महाराणा प्रताप यांचे जन्मस्थळ आहे. चित्तोडगढमध्ये आंदोलनादरम्यान कथितरीत्या हवेत गोळीबार केल्याप्रकरणी भीलवाडाच्या एका व्यक्तीविरुद्ध आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट असून दीपिका पदुकोण ही राणी पद्मीणी हिच्या मुख्य भूमिकेत आहे. (वृत्तसंस्था)

चित्रपट महोत्सवावर बहिष्कार टाकावा : शबाना आझमी
मुंबई : चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोन यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ फिल्म इंडस्ट्रीजने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवावर (आयएफएफआय) बहिष्कार टाकावा, असे मत अभिनेत्री शबाना आझमी यांनी व्यक्त केले आहे.

- या परिस्थितीचा उल्लेख ‘सांस्कृतिक विनाश’असा करत शबाना आझमी यांनी या मुद्यावर मौन बाळगून असलेल्या माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणी यांच्यावर टीका केली आहे.
- १९८९ मध्ये सफदर हाशमी यांच्या हत्येनंतर काँग्रेस दिल्लीत चित्रपट महोत्सवाची तयारी करीत होते तसेच सध्या होत आहे, असेही त्या म्हणाल्या. चित्रपट महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर या काळात गोव्यात होत आहे.

Web Title: Kumbhalgad's doors closed on the promise of 'Padmavati', Rajput community's demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.