कुणाल कामराची इंडिगोला कायदेशीर नोटीस; केली 25 लाखाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 05:45 PM2020-02-01T17:45:41+5:302020-02-01T17:46:02+5:30
माझ्यावर तडकाफडकी बंदी घालण्याचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी कुणाल यांनी केली आहे.
नवी दिल्ली : कॉमेडियन कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी 25 जानेवारी रोजी मुंबईहून लखनौला जाण्यासाठी विमानाने प्रवास करत होते. दरम्यान कामरा यांनी गोस्वामी यांच्यासोबत गैरवर्तन करत त्याच्या व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट केला होता. त्यामुळे गोस्वामी यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप करत कामरावर इंडिगोसह इतर विमान कंपन्यांनी सहा महिने प्रवास बंदी घातली होती. तर आता नुकसानभरपाई द्या म्हणत कुणाल कामरा यांनी इंडिगोला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
कुणालने कामरा यांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हंटले आहे की, इंडिगो कंपनीने आपल्यावर घातलेली बंदी तात्काळ मागे घ्यावी. तसेच ‘कंपनीने सर्व वर्तमानपत्रे, इलेक्ट्रीक माध्यामे आणि कंपनीच्या सर्व सोशल नेटवर्किंग साईट्स अकाऊंटवरुन आपली बिनशर्थ माफी मागावी,’ अशी मागणीही कुणालने केली आहे.
तर कंपनीने केलेल्या कारवाईमुळे मला मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे माझ्यावर तडकाफडकी बंदी घालण्याचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी कुणाल यांनी केली आहे. त्याचप्रमाणे कंपनीने बंदी घातल्याने झालेल्या मानसिक त्रासाच्या मोबदल्यात 25 लाखांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कुणाल कामरा यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विटही केलं आहे.
You’re love & support is helping me go legal against @IndiGo6E
— Kunal Kamra (@kunalkamra88) February 1, 2020
Also Lawmen & White have taken this fight to court for me as special case,
To all artists out there don’t fear there are enough good people in society to always support the constitution...https://t.co/5kCrkKn0l3