Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 12:01 PM2024-11-01T12:01:32+5:302024-11-01T12:05:35+5:30
भाजपाचे उमेदवार रामवीर सिंह ठाकूर हे मतदारांवर विजय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
मुरादाबादच्या कुंदरकी विधानसभा जागेवर होणाऱ्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने रामवीर सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचे उमेदवार रामवीर सिंह ठाकूर हे मतदारांवर विजय मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. निवडणूक कार्यक्रमात त्यांनी केलेलं वक्तव्य सतत चर्चेत आहे. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
भाजपाचे उमेदवार रामवीर सिंह ठाकूर यांनी एका कार्यक्रमात मंचावरून बोलताना सांगितलं की, निवडणूक जिंकल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या पन्ना प्रमुखांना ड्रायव्हिंग लायसन्स ठेवण्याची गरज भासणार नाही. ते पुढे म्हणाले की, भाजपाच्या पन्ना प्रमुखांची डायरी हेच त्यांचं लायसन्स असेल आणि तुम्हाला पकडण्याची हिंमत एकाही पोलिसात नाही.
#मुरादाबाद की #कुंदरकी विधानसभा उपचुनाव में भाजपा प्रत्याशी ठाकुर रामवीर सिंह ने मंच से एक डायरी दिखाते हुए कहा कि यदि पन्ना प्रमुख उपचुनाव में जीत हासिल करते हैं, तो यह डायरी उनके लिए "लाइसेंस" का काम करेगी। उन्होंने कहा कि इस डायरी को दिखाने पर किसी सिपाही की हिम्मत नहीं होगी… pic.twitter.com/OVWxlsxSck
— UttarPradesh.ORG News (@WeUttarPradesh) October 31, 2024
कुंदरकी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रामवीर सिंह ठाकूर म्हणाले, "आता बाईक पकडली तर ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, विम्याची कागदपत्रं दाखवायची गरज नाही, तर भाजपाची डायरी दाखवून पोलीस तुमची बाईक सोडतील. कोणत्याही पोलिसाची तुम्हाला पकडण्याची हिंमत होणार नाही."
"कोणत्याही पोलिसाने तुम्हाला पकडलं तरी भाजपाच्या पन्ना प्रमुखांची ही डायरी दाखवल्यास फायदा होईल आणि तुमची गाडी पकडण्याची हिंमत कोणीही पोलीस करणार नाही." त्यांच्या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विधान केलं तेव्हा मंचावर उत्तर प्रदेश भाजपा अध्यक्ष चौधरी भूपेंद्र सिंह, उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री गुलाब देवी, सहकार मंत्री जेपीएस राठोड यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते.