Jammu Kashmir : कुपवाडामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 08:15 AM2018-10-11T08:15:26+5:302018-10-11T08:56:05+5:30
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत.
श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. गुरुवारी (11 ऑक्टोबर) सकाळी जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेराव घातला आहे. चकमकीदरम्यान संपूर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून कडेकोड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
Kupwara: Encounter underway between terrorists and security forces in Handwara's Shartgund Bala. Two to three terrorists believed to be trapped. Internet services suspended in the area. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) October 11, 2018
सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. कुपवाडा जिल्ह्यात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. परिसरात दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.