तामिळनाडू : वणव्यामध्ये 9 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 03:20 PM2018-03-12T15:20:38+5:302018-03-12T15:20:38+5:30
तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील कुरंगानी जंगलात लागलेल्या वणव्यात मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
थेनी - तामिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील कुरंगानी जंगलात लागलेल्या वणव्यात मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जंगलात लागलेल्या वणव्यात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला, चार पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. दरम्यान, बचाव पथकाला आतापर्यंत 28 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आले आहे. यातील 10 जणांना किरकोळ तर 8 जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जंगलात रविवारी ( 11 मार्च ) वणवा पेटला होता.
जंगलात पसरलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बचाव कार्यामध्ये वायू सेनेचीही मदत घेतली जात आहे. वायू सेना हेलिकॉप्टरच्या मदतीनं जंगलातील या वणव्यात अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
#KuranganiForestFire Update: 16 commandos of Garud Commando Force and 4 choppers from the Indian Air Force, with one of them at stand by, at the search and rescue operation since this morning. Operation underway. 15 people have been rescued so far. #TamilNadu
— ANI (@ANI) March 12, 2018
#UPDATE: IAF helicopters arrive at Theni for the search and rescue operation of those stuck in the #KuranganiForestFire in Tamil Nadu. 15 people have been rescued so far. pic.twitter.com/WTBrBKxoLg
— ANI (@ANI) March 12, 2018