Kushinagar Incident : 'कोणी आई गमावली तर कोणी मुलगी, 10 वेळा फोन करुनही रुग्णवाहिका नाही आली'; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 10:10 AM2022-02-17T10:10:09+5:302022-02-17T10:58:37+5:30

Kushinagar Incident : एका घरात लग्न होतं. लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या.

Kushinagar Incident Uttar pradesh kushinagar shocking incident well 13 women death | Kushinagar Incident : 'कोणी आई गमावली तर कोणी मुलगी, 10 वेळा फोन करुनही रुग्णवाहिका नाही आली'; नेमकं काय घडलं?

Kushinagar Incident : 'कोणी आई गमावली तर कोणी मुलगी, 10 वेळा फोन करुनही रुग्णवाहिका नाही आली'; नेमकं काय घडलं?

googlenewsNext

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्न मंडपात लग्नाच्या विधी सुरू असताना काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री अनेक महिला व मुली एका विहिरीत पडल्या. या दुर्घटनेत 13 महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण परिसरात खळबळ माजली. घटनास्थळी असलेल्या स्थानिक लोकांनी मदत कार्य केल्यानं काही महिलांना बाहेर काढण्यात यश आलं अन्यथा याठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कुशीनगरच्या नेबुओ नौरंगिया येथील स्कूल टोला येथे घडली आहे. याठिकाणी एका घरात लग्न होतं. लग्नाच्या निमित्तानं हळदीच्या कार्यक्रमाला महिला आणि मुली लग्न मंडपाजवळ असलेल्या विहिरीजवळ उपस्थित होत्या. काही विहिरीच्या स्लॅबवर उभ्या होत्या. मात्र मोठ्या संख्येने आलेल्या महिलांमुळे जास्त वजन पडल्यानं स्लॅब खाली कोसळला त्यामुळे सर्व महिला विहिरीत पडल्या.या घटनेची स्थानिकांनी तात्काळ कंट्रोल रुमला फोन करुन पोलिसांना माहिती दिली. काही लोकांनी इतरांची वाट न पाहता मदत कार्य सुरू केले. 

जवळपास दीड तास रुग्णवाहिकेसाठी फोन करत होतो पण...

विहिरीत महिलांची संख्या अधिक असल्याने काही स्थानिकांची तारांबळ उडाली. यात काही महिलांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु 13 महिलांचा मृत्यू झाला. या घटनेने कोणी आपली आई तर कोणी मुलगी गमावली आहे. लग्न मंडपात उपस्थित असलेल्या काही लोकांनी नेमकं काय घडलं त्याबाबत आता माहिती दिली आहे. मदतीसाठी रुग्णवाहिकेला 10 वेळा फोन केला. पण मदतीसाठी रुग्णवाहिका काही वेळेत पोहोचली नाही. खरं तर परिसरापासून रुग्णालय फक्त तीन किलोमीटरवर आहे. जवळपास दीड तास रुग्णवाहिकेसाठी फोन करत होतो. पण फोनवर प्रत्येक वेळी रुग्णवाहिका आता येतेच आहे असं उत्तर मिळत असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. 

संपूर्ण गाव हादरला असून सगळीकडे शोककळा

पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. तसेच जखमी झालेल्या काही महिलांना पोलिसांच्याच गाडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. या दुर्घटनेने संपूर्ण गाव हादरला असून सगळीकडे शोककळा पसरली आहे. यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनानं मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: Kushinagar Incident Uttar pradesh kushinagar shocking incident well 13 women death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.