मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 09:22 AM2020-04-24T09:22:29+5:302020-04-24T11:56:18+5:30
CoronaVirus लॉकडाऊन नागरिक एकमेकांच्या संपर्कात न येण्यासाठी करण्यात आले आहे. मात्र, अनेकठिकाणी बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मुलाचे धुमधडाक्यात लग्न लावून देत आहेत.
जयपूर : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केंद्र सरकारने आर्थिक नुकसान होत असतानाही लॉकडाऊन वाढविला आहे. मात्र, या प्रयत्नांना लोकच छेद देत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राजस्थानमध्ये अशाच एका व्यक्तीच्या मुर्खपणामुळे पाच गावांच्या शेकडो लोकांना कोरोनाची लागण होण्याची टांगती तलवार आहे.
लॉकडाऊन नागरिक एकमेकांच्या संपर्कात न येण्यासाठी करण्यात आले आहे. मात्र, अनेकठिकाणी बाजारात खरेदीसाठी गर्दी करत आहेत. तर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मुलाचे धुमधडाक्यात लग्न लावून देत आहेत. राजस्थानमध्ये तर एका व्यक्तीने कहरच केला आहे. दौसा जिल्ह्यातील एका गावामध्ये एका सरकारी लॅब टेक्निशिअनने हा प्रताप केला आहे. त्याने मुलगा झाला म्हणून त्याच्या आनंदात पंचक्रोशीमध्ये बत्ताशे वाटले. मात्र, याच लॅब टेक्निशिअनला कोरोना झाल्याचे समजताच शेकडो गावकऱ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
छारडा हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशिअन असलेल्या या सरकारी कर्मचाऱ्याला दौसा जिल्हा हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर पाठविण्यात आले होते. ११ एप्रिलपासून त्याला काम देण्यात आले होते. यावेळी त्याची गर्भवती पत्नीही याच सरकारी हॉस्पिटलमध्ये भरती होती. तिला १५ एप्रिलला मुलगा झाला. काही दिवसांनी त्याच्या पत्नीला घरी सोडण्यात आले. यानंतर या कर्मचाऱ्यानेही २१ एप्रिलला स्वत:ला कामातून सूट मिळवत पुन्हा छारडा हॉस्पिटलमध्ये ड्युटी लावून घेतली. या काळात त्याने मुलगा झाला म्हणून आनंद साजरा केल्याने प्रशासनाची भंबेरी उडाली आहे.
राजस्थान में 36 नए पॉजिटिव मामले सामने आए हैं (जयपुर से 13, कोटा से 18, झालावाड़ से 4 और भरतपुर से 1)। राज्य में अब पॉजिटिव मामलों की कुल संख्या 2000 हो गई : राजस्थान स्वास्थ्य विभाग pic.twitter.com/x2ltO8i9ju
— ANI_HindiNews (@AHindinews) April 24, 2020
या टेक्निशिअनने त्याच्या गावी लाका बेराऊंडा, बहिणीच्या गावी आभानेरी, छारडा हॉस्पिटल आणि आजुबाजुचे गाव आणि दौसा हॉस्पिटल परिसरात बत्ताशे आणि लाडू वाटले. तो बहिणीच्या घरी असताना त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली. हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांची काही काळाने कोरोनाची चाचणी घेतली जाते. या कर्मचाऱ्याचीही चाचणी घेण्यात आली होती. मात्र, त्याने घरी राहण्याची सूचना पाळली नाही आणि अख्ख्या पंचक्रोशीत फिरत राहिल्याने आता प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
आणखी वाचा...
अमेरिकेने वाळीत टाकले, चीनने WHO साठी अख्खी तिजोरीच खुली केली
सावधान! आता पीएफ अॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल
विखारी पाकिस्तान! भारताविरोधात मोठ्या सायबर युद्धाला सुरुवात
नोकरी वाचेल पण... केंद्र सरकार कठोर उपाय योजणार; कर्मचाऱ्यांना फायदा की तोटा?