एफटीआयआयच्या आंदोलनाला कामगार संघटनांचा पाठिंबा
By admin | Published: July 29, 2015 12:42 AM2015-07-29T00:42:29+5:302015-07-29T00:42:29+5:30
पुणे: फिल्म अँड टेलिव्हिजन इंन्स्टट्यिूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनावर अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. यातच आता संस्थेच्या तब्बल 182 कंत्राटी कामगारांच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या आंदोलनाला शहरातील कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. याचाच एक भाग म्हणून 30 जुलै रोजी एफटीआयआय येथे विविध कामगार संघटना निदर्शने करणार आहेत. .
Next
प णे: फिल्म अँड टेलिव्हिजन इंन्स्टट्यिूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनावर अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. यातच आता संस्थेच्या तब्बल 182 कंत्राटी कामगारांच्या नोकरीवरही गदा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या आंदोलनाला शहरातील कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. याचाच एक भाग म्हणून 30 जुलै रोजी एफटीआयआय येथे विविध कामगार संघटना निदर्शने करणार आहेत. . यासंदर्भातील घोषणा मंगळवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी लाल निशान पक्षाचे भालचंद्र केरकर, लोकायतचे निरज जैन, सिटूचे अजित अभ्यंकर, पुणे महापालिका कामगार युनियनच्या मुक्ता मनोहर, विद्यार्थी प्रतिनिधी राकेश शुक्ला आदी उपस्थित होते.एफटीआयआयचे नियुक्त केलेले संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे.यासाठी आंदोलन सुरु झाल्यानंतर अनेक संचालकांनी राजीनामे दिले मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधीत असलेल्या लोकांनी राजीनामा न देता हे प्रकरण तापत ठेवले. मुक्ता मनोहर म्हणाल्या, दबावाचे राजकारण करून विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संस्थेचा सामाजिक आशय बाजूला सारून प्रचारमाध्यम म्हणून संस्थेचा वापर करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. पुणेकर जनतेने याचा विचार करायला हवा. -------------------------------------------------------------------------------------------------चौकट स्टुडंट असोसिएशन आणि पालकांची मुक्त चर्चाएफटीआयआय येथे सुरू असलेले आंदोलन आणि एकूणच उच्च शिक्षण पध्दतीमधील गोंधळ या विषयावर एफटीआयआय स्टुडंट असोसिएशन आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे पालक यांची मुक्त चर्चा आयोजित केली आहे. ही चर्चा आणि संवाद बुधवारी (29 जुलै) दुपारी 3.30 वा. मुंबई येथील प्रेस क्लब फोर्ट येथे आयोजित केली आहे.