...अन् 'त्या' मजुरांचं नशीबच चमकलं; खाणीत सापडला ५० लाखांहून अधिक किमतीचा हिरा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 09:49 PM2020-07-21T21:49:56+5:302020-07-21T21:56:09+5:30
कोरोना काळात लॉटरी लागली; पन्ना जिल्ह्यातल्या मजुरांचं नशीब फळफळलं
पन्ना: कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याला रोखण्यासाठी केला गेलेला लॉकडाऊनमुळे लाखो मजुरांचे हाल झाले. हाताला काम नसल्यानं अनेक मजुरांनी गावची वाट धरली. मात्र मध्य प्रदेशातल्या पन्ना जिल्ह्यातल्या रानीपूरमधील खाणीत काम करणाऱ्या ९ मजुरांचं नशीब चमकलं आहे. त्यांना १० कॅरेट ६९ सेंटचा हिरा सापडला आहे. या हिऱ्याचं मूल्य ५० लाख इतकं आहे.
काही दिवसांपूर्वी याच खाणीत एका मजुराला ७० सेंटचा हिरा सापडला होता. हे दोन्ही हिरे कार्यालयात जमा करण्यात आले असून लवकरच त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. पन्ना जिल्हा हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी आधीही अनेक शेतकरी आणि मजुरांना मौल्यवान हिरे सापडले आहेत. यातील सर्वात महागडा हिरा ऑक्टोबर १९६१ मध्ये रसूल मोहम्मद नावाच्या व्यक्तीला सापडला होता. ४४.५५ कॅरेटच्या या हिऱ्याची किंमत त्यावेळी ३ लाख इतकी होती.
हिऱ्याचा दर्जा त्याची चमक पाहून ठरतो. हिऱ्यातून निघणाऱ्या चमकदार किरणांचं प्रमाण जास्त असल्यास त्याचं मूल्य अधिक असतं. मात्र अशा प्रकारचे हिरे पन्नामध्ये कमी सापडतात. काही जणांनाच मौल्यवान हिरे सापडतात. त्यांचं नशीब त्यामुळे चमकून जातं.
मोदी सरकार कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास ८ वरून १२ करणार?; जाणून घ्या 'त्या' बैठकीत काय घडलं
रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणानंतर मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; रेल्वेमंत्र्यांची माहिती
फक्त बँकाच नव्हे, तर 'या' कंपन्यांनाही मोदी सरकार विकण्याच्या तयारीत; असा आहे 'प्लॅन'