लयभारी! शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज; शेतकऱ्याने पाठवली थेट विमानाची तिकिटे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 09:31 AM2020-08-25T09:31:21+5:302020-08-25T09:42:18+5:30
गावी गेलेल्या कामगारांना परत कामावर बोलावणं हे व्यावसायिकांसाठी आव्हान आहे. मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी नानाविध शक्कल लढवली जात आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 30 लाखांवर पोहोचली आहे. तर 50 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांनी काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला अन् आपलं गाव गाठलं. गावी गेलेल्या कामगारांना परत कामावर बोलावणं हे व्यावसायिकांसाठी आव्हान आहे. मजुरांना कामावर परत बोलावण्यासाठी नानाविध शक्कल लढवली जात आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.
लॉकडाऊनमध्ये घरी गेलेल्या प्रवासी मजुरांची आता कमतरता भासू लागली आहे. दिल्लीच्या शेतकऱ्यांना देखील आता शेतात काम करण्यासाठी मजुरांची आवश्यकता आहे. शेतात काम करायला मजूर नाहीत म्हणून एका शेतकऱ्याने मजुरांना थेट विमानाचं तिकीट पाठवल्याची घटना समोर आली आहे. पप्पन सिंह असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांनी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. पप्पन सिंह यांची मशरुमची शेती आहे. शेतात काम करण्यासाठी मजुरांची गरज आहे.
'या' ठिकाणी घडली दुर्घटना, दोन जण जखमीhttps://t.co/mwzkhZn2hR#SocialMedia#Viral
— Lokmat (@MiLOKMAT) August 25, 2020
पप्पन यांनी 20 प्रवासी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. हे प्रवासी मजूर बिहारमधील पाटणा विमानतळावरून लवकरच दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी रवाना होतील. मिळालेल्या माहितीनुसार, पप्पन सिंह दिल्लीतील तिगिपूर गावचे रहिवासी आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून मशरुमची शेती करतात. कित्येक वर्षांपासून अनेक मजूर त्यांच्या शेतात काम करत आहेत. मात्र लॉकडाऊनमध्ये मजूर बिहारला आपल्या गावी निघून गेले. पप्पन सिंह यांनी या सर्व मजुरांसाठी पहिल्यांदा ट्रेनचं तिकीट बूक करण्याचा विचार केला.
'या' मित्राच्या आठवणीने मोदी झाले भावूकhttps://t.co/09r1hUzRkF#NarendraModi#BJPpic.twitter.com/zbUs4yLb0w
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2020
पुढील दीड महिन्यांपर्यंत कोणतीही ट्रेन उपलब्ध नाही. त्यामुळे पप्पन यांनी 20 प्रवासी मजुरांसाठी विमानाचं तिकीट बूक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. याआधीही काही व्यावसायिकांनी मजुरांना परत बोलवण्यासाठी विमानाची तिकिटे पाठवली आहेत. काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मजुरांना परत कामावर बोलावण्यासाठी त्यांच्या मालकाने थेट विमानाची तिकिटे बुक केली होती. तिकिटे मजुरांना पाठवण्यात आली. बिल्डरने उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये राहणाऱ्या मजुरांना परत कामावर हजर होण्यासाठी ही सोय केली होती.
'या' नेत्याने काँग्रेसला लगावला टोला https://t.co/p7HNNVIK0h#Congress#CongressPresident#priyankagandhi#RahulGandhi#SoniaGandhipic.twitter.com/m6qCiuaR6H
— Lokmat (@MiLOKMAT) August 24, 2020
महत्त्वाच्या बातम्या
फ्लायओव्हरचा भाग कोसळल्याचा व्हायरल फोटो ना मुंबईचा, ना पुण्याचा, ना बंगळुरूचा... जाणून घ्या सत्य
"...असा पक्ष कोणालाही वाचवता येणार नाही", शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल
"काँग्रेस अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधींची मुलंही योग्य उमेदवार"
"मला माझ्या मित्राची उणीव प्रकर्षाने जाणवतेय", Video शेअर करत मोदी झाले भावूक
कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचं मंगल करावं, शरद पवारांचं गणरायाला साकडं