LAC वर पुन्हा हालचाल वाढली! लडाखमध्ये चिनी हवाईदलाचा युद्ध सराव; भारतानंही तैनात केले राफेल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 09:22 AM2021-06-09T09:22:28+5:302021-06-09T09:24:29+5:30

भारताची नजर लडाख समोरील चिनी सीमेतील काशगर, होतान, न्यिंगची, शिगात्से, नगारी गुन्सा, ल्हासा गोंगकर आणि चमडो पंगटा एअरबेसवर...

LAC China holds major aerial exercise close to eastern ladakh india keeping close watch Rafale Deployed | LAC वर पुन्हा हालचाल वाढली! लडाखमध्ये चिनी हवाईदलाचा युद्ध सराव; भारतानंही तैनात केले राफेल

LAC वर पुन्हा हालचाल वाढली! लडाखमध्ये चिनी हवाईदलाचा युद्ध सराव; भारतानंही तैनात केले राफेल

Next
ठळक मुद्देचिनी हवाई दलाच्या 20 हून अधिक लढाऊ विमानांनी पूर्व लडाख भागाजवळ झालेल्या युद्ध सरावात भाग घेतला होता.भारताने तयारी म्हणून उत्तरेकडील सीमेवर राफेलसह आपल्या लढाऊ विमानांचा ताफाही सक्रिय केला आहे.भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानेही एलएसीवर सराव करताना दिसून आली.

नवी दिल्ली - देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहेत, तर लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) तनाव वाढताना दिसत आहे. चीनने पूर्व लडाखमध्ये पुन्हा एकदा आपली तैनात वाढवली आहे. याच बरोबरच चिनी हवाई दलाने नुकताच भारतीय सीमेजवळ मोठा युद्ध सराव केला. यानंतर भारतीय गुप्तचर विभाग अधिक सतर्क झाला आहे. (LAC China holds major aerial exercise close to eastern ladakh india keeping close watch Rafale Deployed)

वरिष्ठ सरकारी सूत्रांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, चिनी हवाई दलाच्या 20 हून अधिक लढाऊ विमानांनी पूर्व लडाख भागाजवळ झालेल्या युद्ध सरावात भाग घेतला होता. महत्वाचे म्हणजे, ज्या एअरबेसवरून गेल्या वर्षी चीनने लडाखमध्ये आपल्या सैनिकांना मदद पोहोचवली होती, त्याच एअरबेस वरून हा युद्धाभ्यास केरण्यात आला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने तयारी म्हणून उत्तरेकडील सीमेवर राफेलसह आपल्या लढाऊ विमानांचा ताफाही सक्रिय केला आहे. भारताची नजर लडाख समोरील चिनी सीमेतील काशगर, होतान, न्यिंगची, शिगात्से, नगारी गुन्सा, ल्हासा गोंगकर आणि चमडो पंगटा एअरबेसवर आहे. शिनजियांग आणि तिब्बत भागातील सात चिनी सैन्य ठिकानांवर लक्ष ठेवण्यासाठी  उपग्रह आणि इतर पद्धतीने लक्ष ठेवले जात आहे. भारतीय हवाईदलाच्या फॉरवर्ड एअरबेसला पश्चिम आणि उत्तरेकडे जर काही स्थिती उद्भवली, तर त्याचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

यातच, भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानेही एलएसीवर सराव करताना दिसून आली. सांगण्यात येते, की चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी एअर फोर्सने (PLAAF) नुकतेच आपले अनेक एअरबेस अपग्रेड केले आहेत. यात राहण्यासाठी कॅम्प, रनवेचा विस्तार आणि अतिरिक्त फोर्सच्या तैनातीचा समावेश आहे.

Web Title: LAC China holds major aerial exercise close to eastern ladakh india keeping close watch Rafale Deployed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.